IFS Officer : पाथर्डी शहरातील तरुण बनला IFS अधिकारी; वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी घेतली मोठी झेप

कष्टकरी आई-वडिलांचा मुलगा उच्च पदस्थ अधिकारी होतो ही सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट

0
IFS Officer : पाथर्डी शहरातील तरुण बनला IFS अधिकारी; वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी घेतली मोठी झेप
IFS Officer : पाथर्डी शहरातील तरुण बनला IFS अधिकारी; वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी घेतली मोठी झेप

IFS Officer : पाथर्डी : केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (UPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेत शहरातील अक्षय हरीभाऊ पवार (रा. वीर सावरकर मैदान, पाथर्डी) या तरुणाची भारतीय वन सेवा अधिकारी (IFS Officer) पदी निवड झाली आहे. शुक्रवार सायंकाळी (ता. ८) याबाबतचा निकाल (Results) जाहीर झाला.

नक्की वाचा : मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकाचा अपघातात मृत्यू

२८ व्या वर्षी या पदाला गवसणी

या तरुणाने वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी या पदाला गवसणी घातली आहे. अक्षय पवार याची आई वडील लोखंडाला तापून त्या तापलेल्या लोखंडावरती घाव घालून शेतीची अवजारे तयार करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

हे अक्षयच्या यशाचे आणि कष्टाचे फलित (IFS Officer)

आशा कष्टकरी आई-वडिलांचा मुलगा उच्च पदस्थ अधिकारी होतो ही सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट असून अक्षय सुद्धा आई-वडिलांच्या कामात मदत करतो हेच अक्षयच्या यशाचे आणि कष्टाचे फलित आहे. या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.