Local Crime Branch : व्यापाऱ्याला मारहाण करून जबरीने पैसे उकळणारा आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local Crime Branch : व्यापाऱ्याला मारहाण करून जबरीने पैसे उकळणारा आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0

Local Crime Branch : नगर : राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे व्यापाऱ्याला अडवून मारहाण करत जबरीने रोख रक्कम (Theft Accompanied by Assault) उकळल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) एका आरोपीस अटक (Arrest) केली आहे. प्रशांत उर्फ चाचा रावसाहेब पलघडमल (वय ३२, रा. सात्रळ ता. राहुरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

नक्की वाचा: मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकाचा अपघातात मृत्यू

फिर्यादीस जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण

याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून आरोपींनी गैरकायदेशीर जमाव जमवून फिर्यादीस जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. तसेच त्यांच्याकडून जबरीने २५ हजार ४०० रुपयांची रोख रक्कम काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सापळा रचून आरोपीला घेतले ताब्यात (Local Crime Branch)

या गुन्ह्यातील आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. तपासादरम्यान पोलिसांना प्रशांत पलघडमल हा संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द येथील अमरधाम परिसरात थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीने साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पुढील तपासासाठी राहुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.