Accident : माणिकदौंडी घाटात ग्रॅनाईटच्या ट्रकचा अपघात; चालकासह क्लीनर गंभीर जखमी

गाडीत असलेल्या क्लीनरने जीव वाचवण्यासाठी ट्रकमधून मारली उडी

0
Accident : माणिकदौंडी घाटात ग्रॅनाईटच्या ट्रकचा अपघात; चालकासह क्लीनर गंभीर जखमी
Accident : माणिकदौंडी घाटात ग्रॅनाईटच्या ट्रकचा अपघात; चालकासह क्लीनर गंभीर जखमी

Accident : पाथर्डी : तालुक्यातील माणिकदौंडी घाटामध्ये (Manikdaundi Ghat) शुक्रवारी (ता. ८) पहाटे ग्रॅनाईट फरशी वाहून नेणाऱ्या अवजड ट्रकचे नियंत्रण सुटून भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात ट्रक चालक व गाडीत असलेला एक क्लीनर गंभीर जखमी (Seriously injured) झाला असून ट्रकचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. बिपिन उलमूलवे (वय ४०) व गणेश गोतवे (वय २८ रा. लातूर) असे जखमी झालेल्यांची नावे आहे. ही घटना घाटातील धोकादायक उताराच्या वळणावर घडली.

नक्की वाचा : पाथर्डी शहरातील तरुण बनला IFS अधिकारी; वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी घेतली मोठी झेप

ट्रक पलटी होऊन त्याचा चक्काचूर

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रक बारामती येथून पाथर्डीकडे येत होता. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रॅनाईट फरशी भरलेली होती. माणिकदौंडी घाटातील तीव्र उतारावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक भरधाव वेगात रस्त्याच्या बाजूच्या नाल्यात जाऊन घाटाच्या डोंगरकपारीवर आदळला. अपघात इतका भीषण होता की ट्रक पलटी होऊन त्याचा चक्काचूर झाला. अपघाताची चाहूल लागताच गाडीत असलेल्या क्लीनरने जीव वाचवण्यासाठी ट्रकमधून उडी मारली. मात्र, उडी घेताना त्याला गंभीर दुखापत झाली. तर चालक ट्रकसोबत अपघातात अडकून गंभीर जखमी झाला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

रस्त्यावर फरशांचा मोठा खच (Accident)

ट्रक पलटी झाल्याने त्यामधील ग्रॅनाईट फरशांचा मोठा खच रस्त्यावर पडला होता. त्यामुळे घाटातील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल धनराज चाळक व कानिफनाथ गोफणे यांनी घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील फरशांचा खच बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, पाथर्डी तालुक्यातील करंजी व माणिकदौंडी हे घाट दिवसेंदिवस अपघातांचे आणि मृत्यूचे सापळे बनत चालल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. 

घाटातील धोकादायक वळणे, अरुंद रस्ता आणि वाढती अवजड वाहनांची वाहतूक यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असून प्रशासनाने तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातून होत आहे.