
Theft of Gold Jewelry : नगर : शहरातील केडगाव परिसरातील श्रेयागार्डन येथे झालेल्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात चोरीस गेलेले सुमारे १७ लाख ३३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने (Theft of Gold Jewelry) आणि रोख रक्कम कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) हस्तगत केली आहे. या प्रकरणात मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा सहभाग निष्पन्न झाला असून पोलिसांनी चार दिवसांच्या विशेष मोहिमेनंतर कारवाई केली.
नक्की वाचा : व्यापाऱ्याला मारहाण करून जबरीने पैसे उकळणारा आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
दागिन्यांची पिशवी अज्ञात चोरट्यांनी केली लंपास
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिसगाव (ता. पाथर्डी) येथील शिक्षिका सिंधु महेश माने या २ मे ला त्यांचा भाचा अशितोष नंदकुमार मरकड यांच्या साखरपुड्यासाठी श्रेयागार्डन येथे आल्या होत्या. त्यांनी स्वतःचे सोन्याचे दागिने निळ्या रंगाच्या कापडी पिशवीत ठेवले होते. तसेच नातेवाईक नंदकुमार मरकड यांनी नवरी-नवरदेवासाठी भेट म्हणून दिलेले सहा तोळ्यांचे सोन्याचे गंठण आणि अंगठीही त्याच पिशवीत होती. कार्यक्रमादरम्यान फोटो काढण्यासाठी त्या स्टेजवर गेल्या असता, पायाजवळ ठेवलेली दागिन्यांची पिशवी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी (Theft of Gold Jewelry)
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कार्यक्रमस्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक विश्लेषण तसेच अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या पद्धतीचा अभ्यास करून तपासाची सूत्रे मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातील कडिया सांसी परिसरापर्यंत पोहोचली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक मध्यप्रदेशात रवाना करण्यात आले.
चार दिवस शोधमोहीम राबविण्यात आली
स्थानिक बोडा पोलिसांच्या मदतीने दुर्गम आणि संवेदनशील भागात सलग चार दिवस शोधमोहीम राबविण्यात आली. त्यानंतर संबंधित विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आणि चोरीस गेलेले सुमारे १६ तोळे सोन्याचे दागिने तसेच २५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण १७ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे करीत आहेत.
यांच्या पथकाने केली कारवाई
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत कोतवाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण पाटील, गणेश देशमुख, पोलीस अंमलदार दळवी, विनोद बोरगे, दौड, साबीर शेख, राहूल शिंदे, संदिप पवार (एम.आय.डी.सी. पो. ठाणे) रोहीणी दंरदले, वर्षा पंडीत, सुरज कदम, दिपक रोहोकले, सत्यजित शिंदे, रमेश शिंदे, अतुल कोतकर, सचिन लोळगे, अमोल गाडे, अतुल लाटे, अतुल काजळे, शिरीष तरटे, राहुल मासाळकर, गंगाधर आंग्रे, किरण बडे, पल्लवी रोहकले तसेच दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडु यांचे पथकाने केलेले आहे. तसेच मध्यप्रदेश बोडा पो. ठाणे प्रभारी अधिकारी देवेंद्रसिंह राजपुत, कपिल अटारिया, दुष्यंत जाट, पुजा मुवेल यांच्या पथकाने कारवाई केली.


