Gunaratna Sadavarte Attack : गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर मनसैनिकांचा हल्ला; शाईफेकनंतर सुपाऱ्याही फेकल्या

0
Gunaratna Sadavarte Attack : गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर मनसैनिकांचा हल्ला; शाईफेकनंतर सुपाऱ्याही फेकल्या
Gunaratna Sadavarte Attack : गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर मनसैनिकांचा हल्ला; शाईफेकनंतर सुपाऱ्याही फेकल्या

नगर: जालन्यात अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte Attack) यांच्या वाहनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Manse) पदाधिकाऱ्यांनी शाई आणि सुपारी फेक (Ink and Betel Nut Throwing) केली आहे. ज्या वाहनावर शाई आणि सुपारी फेकल्या त्या वाहनात गुणरत्न सदावर्ते यांची पत्नी आणि मुलगी होती. जालना शहरातल्या विशाल कॉर्नर परिसरात ही घटना घडली आहे. गुणरत्न सदावर्ते आज जालना दौऱ्यावर असताना ही घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नक्की वाचा: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक; कारण काय?

मनसेचे राहुल रत्नपारखे यांच्यासह पदाधिकाऱ्यांकडून शाईफेक (Gunaratna Sadavarte Attack)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जालना शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांच्यासह अजून काही पदाधिकाऱ्यांकडून ही शाई फेक करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपूर्वी मुंबईतील रिक्षा चालकांच्या संदर्भात मराठी अमराठी या वादावर गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर जालन्यात मनसैनिक आक्रमक झाले होते. चंदनझिरा पोलिसांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

अवश्य वाचा: राहात्यातील बेकायदा गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश; श्रीरामपुरातील डॉक्टरसह दोघे गजाआड

रत्नपारखे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल (Gunaratna Sadavarte Attack)

मिळालेल्या माहितीनुसार, गुणरत्न सदावर्ते हे आज शनिवारी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने जालना दौऱ्यावर आले होते. त्यांचा ताफा जालना शहरातील विशाल कॉर्नर भागातून जात असताना, आधीच दबा धरून बसलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी अचानक त्यांच्या वाहनाला घेराव घातला. यावेळी कार्यकर्त्यांनी सदावर्तेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांच्या वाहनावर काळी शाई तसेच सुपारी फेकली. वाहनाच्या काचांवर शाई पडल्याने चालकाला वाहन थांबवावे लागले. सदावर्ते यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत अशा प्रकारे झालेल्या हल्ल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. पोलिसांनी रत्नपारखे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.