Three Goats Stolen : घरासमोरील शेडमधून तीन शेळ्या चोरीला; ३० हजारांचा ऐवज लंपास

Three Goats Stolen : घरासमोरील शेडमधून तीन शेळ्या चोरीला; ३० हजारांचा ऐवज लंपास

0
Three Goats Stolen : घरासमोरील शेडमधून तीन शेळ्या चोरीला; ३० हजारांचा ऐवज लंपास
Three Goats Stolen : घरासमोरील शेडमधून तीन शेळ्या चोरीला; ३० हजारांचा ऐवज लंपास

लोखंडवाडी सांगवी खुर्द येथील घटना

Three Goats Stolen : पाथर्डी : तालुक्यातील लोखंडवाडी सांगवी खुर्द येथे अज्ञात चोरट्यांनी घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेल्या तीन शेळ्या चोरून (Three Goats Stolen) नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचा – गावातच मिळत आहेत शासकीय सेवा; नागरिकांचा मानसिक ताण होतोय कमी

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आशाबी लाला शेख (वय ७०, रा. लोखंडवाडी सांगवी खुर्द, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) या आपल्या कुटुंबासह शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. दि. ६ में रोजी दुपारी त्या घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेल्या होत्या. दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास त्या उठल्यानंतर घरासमोर बांधलेल्या शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी गेल्या असता त्यांना शेडमध्ये बांधलेल्या तीन शेळ्या दिसून आल्या नाहीत.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

यानंतर त्यांनी परिसरात तसेच गावामध्ये शोध घेतला; मात्र शेळ्या मिळून न आल्याने अज्ञात चोरट्याने त्या चोरून नेल्याची खात्री झाली. चोरीस गेलेल्या शेळ्या काळ्या रंगाच्या असून मोठी शिंगे असलेल्या तीन शेळ्यांची एकूण किंमत अंदाजे ३० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी शनिवारी अज्ञात चोरट्याविरुद्ध पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.