Seed Conservation Program : विदर्भ बीज संवर्धक कार्यक्रमात वसुंधरा अकॅडमीच्या रुशांकचा सहभाग

Seed Conservation Program : विदर्भ बीज संवर्धक कार्यक्रमात वसुंधरा अकॅडमीच्या रुशांकचा सहभाग

0
Seed Conservation Program : विदर्भ बीज संवर्धक कार्यक्रमात वसुंधरा अकॅडमीच्या रुशांकचा सहभाग
Seed Conservation Program : विदर्भ बीज संवर्धक कार्यक्रमात वसुंधरा अकॅडमीच्या रुशांकचा सहभाग

Seed Conservation Program : अकोले : महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ (Maharashtra State Biodiversity Board) आणि महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प तसेच बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन पुणे (BAIF Development Research Foundation) यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथे विदर्भ बीज संवर्धक कार्यक्रम (Seed Conservation Program) उत्साहात पार पडला. या कार्यशाळेमध्ये वसुंधरा अकॅडमी, अकोलेचा सहावीतील विद्यार्थी रुशांक योगेश नवले याने सहभाग घेतला होता.

हे वाचा – गावातच मिळत आहेत शासकीय सेवा; नागरिकांचा मानसिक ताण होतोय कमी

६० बीज संवर्धकांनी नोंदवला सहभाग

या कार्यशाळेत विदर्भातील सुमारे ६० बीज संवर्धकांनी सहभाग नोंदवला. अकोले तालुक्यातील बीज संवर्धक तसेच भारत सरकारच्या ‘सीड जिनोम सेवियर’ पुरस्काराने सन्मानित ममताबाई भांगरे आणि बायफचे जैवविविधता विभागाचे सहजिल्हा कार्यक्रम अधिकारी योगेश नवले यांनी मार्गदर्शन केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

प्राचार्य व शिक्षकांनी केले कौतुक (Seed Conservation Program)

कार्यशाळा दरम्यान पीक वाण विविधता, रानभाज्या, तसेच स्थानिक पशुधन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये रुशांकने उत्साहाने सहभाग घेत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या या यशस्वी सहभागाबद्दल अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर नवले, कोषाध्यक्ष तथा प्राचार्या डॉ. जयश्री देशमुख, सचिव विक्रम नवले, सहसचिव प्राचार्या अल्फोन्सा डी., उपप्राचार्या राधिका नवले, संचालक मंडळ, सर्व विभागांचे प्राचार्य व सर्व शिक्षक यांनी कौतुक केले.