Ahilyanagar Premier League | अहिल्यानगर प्रीमियर लीगमध्ये जी एन एस नाईट रायडर्स विजेता; सुपर ओव्हरमध्ये रंगला थरार

0

Ahilyanagar Premier League | नगर : अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व एस के क्रिकेट अकॅडमीच्या वतीने आयोजित १६ वर्षाखालील अहिल्यानगर प्रीमियर लीगच्या (Ahilyanagar Premier League) दुसऱ्या वर्षांतील अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा झाला. जी एन एस नाईट रायडर्स व अहिल्यानगर सुपर किंग या दोन बलाढ्य संघांमध्ये झालेल्या या लढतीत अखेर सुपर ओव्हरमध्ये जी एन एस नाईट रायडर्स संघाने बाजी मारत विजेतेपद पटकावले, तर अहिल्यानगर सुपर किंग संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

हे वाचा – घरासमोरील शेडमधून तीन शेळ्या चोरीला; ३० हजारांचा ऐवज लंपास

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी (Ahilyanagar Premier League)

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत जी एन एस नाईट रायडर्स संघाने २० षटकांत ४ बाद १९० धावांचे मोठे आव्हान उभे केले तर अहिल्यानगर सुपर किंग संघाने पाटला करत.  कुशल पाटीलने अवघ्या ५९ चेंडूत १०५ धावांची तुफानी खेळी करत ८ चौकार व ६ षटकार ठोकले. त्याला राम खोमणेने ५८ धावांची साथ देत दोघांनी १६३ धावांची भक्कम भागीदारी उभी केली.

अवश्य वाचा – गावातच मिळत आहेत शासकीय सेवा; नागरिकांचा मानसिक ताण होतोय कमी

जोरदार लढत (Ahilyanagar Premier League)

१९१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अहिल्यानगर सुपर किंग संघानेही जोरदार लढत दिली. शेवटच्या षटकात विजयासाठी ११ धावांची गरज असताना सामन्याने रंगत घेतली. अखेरच्या दोन चेंडूत ७ धावांची गरज असताना फलंदाजाने षटकार मारत सामना बरोबरीत आणला. शेवटच्या चेंडूवर एक धाव हवी असताना मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये अहिल्यानगर सुपर किंग संघाची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. पहिल्याच चेंडूवर षटकाराच्या प्रयत्नात झेलबाद, तर दुसऱ्या चेंडूवर त्रिफळा उडाल्याने संघाला एकही धाव करता आली नाही. त्यामुळे जी एन एस नाईट रायडर्सला विजयासाठी केवळ एका धावाची गरज होती, जी त्यांनी दुसऱ्याच चेंडूवर चौकार मारत सहज पूर्ण केली आणि विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित (Ahilyanagar Premier League)

या रोमांचक सामन्याचा थरार अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. प्रत्येक चेंडूवर जल्लोष आणि टाळ्यांचा कडकडाट होत होता. स्पर्धेनंतर पारितोषिक वितरण सोहळा नगरसेवक करण कराळे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आयोजक एस के क्रिकेट अकॅडमीचे संदीप पाटोळे, अजय कविटकर, धीरज आव्हाड, सम्राट देशमुख, वैभव कराडे, ऋषिकेश सुंबे तसेच खेळाडू, पालक, मार्गदर्शक आणि क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैयक्तिक कामगिरीत मॅन ऑफ द मॅच पुरस्कार प्रेम इगे याला, मॅन ऑफ द सिरीज राम खोमणे याला, बेस्ट फिल्डर ओंकार टकले, बेस्ट बॉलर कुशल पाटील, तर बेस्ट बॅट्समन प्रिन्स सिंग याला देण्यात आला. तसेच उदयोन्मुख खेळाडू म्हणून तन्मय फुले आणि कार्तिक कराडे यांचा सन्मान करण्यात आला.

दर्जेदार खेळाडू घडतात (Ahilyanagar Premier League)

यावेळी नगरसेवक करण कराळे म्हणाले की, अशा स्पर्धांच्या माध्यमातून दर्जेदार खेळाडू घडतात. एस के क्रिकेट अकॅडमी लहान वयातच खेळाडूंना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. सेमी फायनल व फायनलसारख्या सामन्यांमधून खेळाडूंना मोठा अनुभव मिळतो. क्रिकेटमध्ये १९ वर्षांपर्यंत करिअरच्या मोठ्या संधी आहेत. त्यामुळे खेळाडूंनी जिद्द, चिकाटी आणि मेहनत ठेवून पुढे जावे. या थरारक सामन्याने उपस्थित प्रेक्षकांना क्रिकेटचा खरा आनंद दिला आणि भविष्यातील उत्कृष्ट खेळाडूंची झलकही पाहायला मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here