Theft of solar panels : चिचोंडी पाटील शिवारात सौर पॅनलची चोरी; अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Theft of solar panels

0
Theft of solar panels : चिचोंडी पाटील शिवारात सौर पॅनलची चोरी; अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Theft of solar panels : चिचोंडी पाटील शिवारात सौर पॅनलची चोरी; अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Theft of solar panels : नगर : शेतातील सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपाचे साहित्य चोरून (Theft of solar panels) नेणाऱ्या अज्ञात चोरट्याविरुद्ध अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात (Ahilyanagar Taluka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिचोंडी पाटील (Chichondi Patil) गावाच्या शिवारात घडली असून, चोरट्यांनी सुमारे १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

हे वाचा – गावातच मिळत आहेत शासकीय सेवा; नागरिकांचा मानसिक ताण होतोय कमी

यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली

याबाबत शहीद हुसेन शहानिजाम सय्यद यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे चिचोंडी पाटील शिवारातील गट क्रमांक ७७/१ मध्ये शेत आहे. या शेतात त्यांनी सिंचनासाठी सौर पॅनल आणि पंप बसवले होते. ८ मे च्या सायंकाळी ७ ते ९ मे च्या सकाळी १० वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्याने शेतात प्रवेश केला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली

१३ पॅनल, ३० हजार रुपयांचा कंट्रोलर आणि १० हजार असे चोरट्यांनी दीड लाख रुपये किमतीचे सौर पंप, तांब्याचे अर्थिंग रॉड असा १ लाख ९० हजार रुपयांचा माल चोरून नेला. सकाळी शेतात गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार भवार करत आहेत.