Niranjan Charitable Organization | नगर : निरंजन सेवाभावी संस्था (Niranjan Charitable Organization) अनाथ मुला-मुलींना आधार देण्यासाठी त्यांचे भविष्य घडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत, अशा संस्थांना मदतीचा हात देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून निरंजन सेवाभावी संस्था काम करत आहे ही कौतुकास्पद बाब आहे. आज सामाजिक संस्थांतील मुलांना आंबा खाण्याची स्पर्धेचा उपक्रम राबवून त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच विविध उपक्रमातून मदतीचा हात दिला जातो. अशा उपक्रमामुळे त्यांचा विकास होण्यास नक्कीच मदत होणार आहे. चांगल्या उपक्रमांसाठी नेहमीच सहकार्य करणार असल्याने सामाजिक संस्थांच्या उन्नत्तीसाठी प्रत्येकाने आपआपल्यापरीने वाटा उचलवा, असे प्रतिपादन उद्योजक जितेंद्र बिहाणी यांनी केले.
हे वाचा – घरासमोरील शेडमधून तीन शेळ्या चोरीला; ३० हजारांचा ऐवज लंपास
आंबे खाण्याच्या स्पर्धेचे आयोजन (Niranjan Charitable Organization)
निरंजन सेवाभावी संस्थेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे सामाजिक संस्थेतील मुलां-मुलींसाठी आंबे खाण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी श्रद्धा बिहाणी, सपना आसावा, कमलेश झवर, संजय पुगालिया, अर्चना पुगालिया, सुरेश चांडक, अतुल डागा, स्वप्नील कुलकर्णी, निलेश बिहाणी, सुमीत चांडक, राहुल झवर, मुकुंद धूत, रविकांत काबरा, विशाल झवर, राहुल बजाज, पवन बंग, पियुष झवर ,महेश बिहाणी ,सुहास चांडक ,भूषण मालु ,मनीष सोमाणी ,योगेश बजाज ,अभिजीत सारडा ,धीरज डागा, सचिन भंडारी ,प्राजक्ता डागा ,योगिता कुलकर्णी ,अर्चना झवर, श्रुती डागा आदी आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा – गावातच मिळत आहेत शासकीय सेवा; नागरिकांचा मानसिक ताण होतोय कमी

आम्हाला समाधान (Niranjan Charitable Organization)
उद्योजक जितेंद्र बिहाणी म्हणाले की, निरंजन सेवाभावी संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे उत्कृष्ट काम सुरु असून त्यांचा पुर्ण वर्षभराचा कार्यक्रम हा ठरलेला असतो. आजच्या या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांच्य चेहर्यावरचा आनंद पाहूण आम्हाला समाधान होत असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रेयवाद घेण्याचा प्रश्न (Niranjan Charitable Organization)
यावेळी उदयोजक संजय पुगलिया की, निरंजन सेवाभावी संस्था यांचे कार्य राज्यामध्ये उत्कृष्टपणे सुरु असून या संस्थेचा कोणी अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी नाही, त्यामुळे श्रेयवाद घेण्याचा प्रश्नच नाही. सर्व एकत्र राहुन एकदिलाने काम करत आहे. त्यांच्या या कार्याबद्दल प्रदेशचा उत्कृष्ट पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी जो उपक्रम राबविला आहे. तो खरोखरच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
हे पहा – सोन्यापेक्षा चांदीत गुंतवणूक ठरेल गेमचेंजर…
याप्रसंगी अतुल डागा म्हणाले, निरंजन संस्थेच्यावतीने नेहमीच सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. यंदाच्यावर्षी संस्थेने अनेक मुला-मुलींचे पालकत्व घेत त्यांच्या सर्वांगिण विकास साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबरच संस्थेच्या सभासदांच्या आनंदक्षणी मिष्ठान्न भोजन अशा संस्थेतील मुलांना दिले जाते. आजही अशा सामाजिक संस्थेतील मुलांना मनसोक्त आंबे खाण्याचा आनंद मिळवून दिला असल्याचे सांगितले. तसेच या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक बंगडीवाला परिवार यांनी सहकार्य केले. याप्रसंगी स्नेहालय, सावली संस्था, बालघर प्रकल्प आदी मधील सुमारे 200 मुले-मुली सहभागी झाले होते. मुकुंद धूत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर स्वप्नील कुलकर्णी यांनी आभार मानले.



