नगर : विधानसभा निवडणुकीआधी सरकारकडून जाहीर करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) महायुतीसाठी गेमचेंजर ठरली आहे. मात्र आता या लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिल २०२६ या दोन महिन्यांचे पैसे (Two months’ worth of money) अजून लाभार्थी महिलांना मिळालेले नाहीत. यामुळे लाडक्या बहिणी पैसे कधी मिळणार? (When will I receive the money) याच्या प्रतीक्षेत आहेत.
नक्की वाचा: लोखंडाला आकार देता देता घडविला आयएफएस अधिकारी; अक्षय पवारची भारतीय वनसेवेत निवड
लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी ३० एप्रिल २०२६ ही शेवटची तारीख होती. याआधी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्याची शेवटची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत देण्यात आली होती. त्यानंतर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी पुन्हा या प्रक्रियेला मुदतवाढ दिली होती. पण आता eKYC करुनही मार्च आणि एप्रिल महिन्याचा हफ्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही.
मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय? (Ladki Bahin Yojana)
लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हफ्ता २८,२८,३० आणि ३१ मार्चपर्यंत जमा झाला होता. पण त्यानंतर मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हफ्त्याला ब्रेक लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या या आठवड्यात मार्च आणि एप्रिल या महिन्यांचा हप्ता एकत्र येऊ शकतो. मंत्रिमंडळ बैठकीत याबाबात निर्णय होण्याची शक्यता आहे. पैसे मंजूर झाल्यानंतर ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील. मात्र याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
अवश्य वाचा: राहात्यातील बेकायदा गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश; श्रीरामपुरातील डॉक्टरसह दोघे गजाआड
किती महिन्यांचे पैसे मिळणार? (Ladki Bahin Yojana)
लाडक्या बहिणींना आता प्रश्न पडला आहे की, मार्च-एप्रिल या दोन महिन्यांचे पैसे जमा होतील? की, मार्च-एप्रिल आणि मे या तीन महिन्यांचे पैसे एकत्र जमा होतील? जर तीन महिन्यांचे पैसे एकत्र जमा झाले तर, लाभार्थी महिलांच्या खात्यात ४५०० रुपये जमा होतील. फक्त मार्च आणि एप्रिलचा हफ्ता मिळाला तर महिलांच्या खात्यात ३ हजार जमा होतील. तसेच महिला व बाल विकास खात्याकडून eKYCची देखील पडताळणी होत आहे, ती पूर्ण झाल्यानंतरच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.



