Karjat Bus Stand : कर्जत : सर्वसामान्य प्रवाशांसह एसटी चालकांची परवड देखील आता थांबली असून कर्जत बसस्थानक (Karjat Bus Stand) परिसराचे सिमेंट काँक्रीटीकरणाने (Cement Concrete) भाग्य उजळले आहे. अनेक दिवसांपासून कर्जतकरांची मागणी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी निधी उपलब्ध करीत पूर्ण केली. यापूर्वी साध्या रिमझिम पावसाने देखील कर्जतच्या बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य पसरले जात होते. काँक्रीटीकरणाने आता बसस्थानक परिसर चकाचक झाला आहे.
नक्की वाचा : ओंकार गायकवाड मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा : प्रभावती घोगरे
सर्वसामान्य प्रवाशांना चालणे देखील मुश्किल
कर्जत बसस्थानकात साधा पाऊस पडला तरी जिकडे-तिकडे चिखलाचे साम्राज्य पसरले जात होते. या चिखलाने बसस्थानक परिसर निसरडा बनत सर्वसामान्य प्रवाशांना चालणे देखील मुश्किल ठरत असे. दुचाकीवर कुटुंबांना सोडण्यासाठी आले असता अनेकदा या निसरड्या परिसरामुळे लहान-सहान अपघात देखील घडल्याचे उदाहरणे पहावयास मिळाली. पावसाळ्यात कर्जतचे बसस्थानक अक्षरशः रग्बी खेळाचे मैदान भासत असे. त्यामुळे कर्जत बसस्थानक परिसराचे सुशोभीकरण होत काँक्रीटीकरणाची मागणी पुढे आली होती.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
परिसर सिमेंट काँक्रीटीकरणाने चकाचक (Karjat Bus Stand)
या प्रश्नांकडे आमदार रोहित पवार यांनी लक्ष देत आपल्या आमदार विकास निधीतून मंजुरी घेत काँक्रीटीकरणाचे काम हाती घेत ते प्रगतीपथाने पूर्णत्वास नेले आहे. तीन आठवड्यात कर्जत बसस्थानकाचा बहुतांश भागाचे सिमेंट काँक्रीटीकरण पूर्ण झाल्याने परिसराचे रुपडे बदलले आहे. उन्हाळ्यात धुळीचे लोट तर पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य आता दूर झाले असून संपूर्ण बसस्थानक परिसर सिमेंट काँक्रीटीकरणाने चकाचक झाल्याने सर्वसामान्य प्रवाशांसह एसटी चालक-वाहक यांची परवड देखील थांबली असल्याने समाधान व्यक्त होत आहे.



