Prabhavati Ghogare : राहाता : येथील १३ वर्षीय ओंकार गायकवाड यांच्या मृत्यूने (Death) संपूर्ण परिसर शोकमग्न झाला असून या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या संशयानुसार हा प्रकार केवळ अपघात (Accident) नसून घात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करा अशी मागणी प्रभावती घोगरे (Prabhavati Ghogare) यांनी केली आहे.
नक्की वाचा : विकास लवांडे याला तत्काळ अटक करा; वारकरी संप्रदायाच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन
गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण आणणे अत्यावश्यक
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रभावती घोगरे यांनी गायकवाड कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यांनी कुटुंबीयांचे दुःख समजून घेत त्यांना धीर दिला आणि न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. घोगरे यांनी यावेळी पोलीस प्रशासनाकडे ठोस मागण्या मांडत या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी तात्काळ करण्यात यावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर त्वरित बंदी घालून नशेखोर व गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण आणणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे (Prabhavati Ghogare)
यासोबतच राहाता परीसरात वाढत चाललेली गुंडगिरी, दहशतीचे वातावरण आणि असामाजिक घटकांचा वाढता प्रभाव याकडेही त्यांनी गांभीर्याने लक्ष वेधले. कायदा व सुव्यवस्थेचा धाक कमी होत असल्याची चिंता व्यक्त करत पोलीस प्रशासनाने तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी मागणी त्यांनी केली. कायदा व सुव्यवस्था बळकट ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेने अधिक सतर्क राहून नियमित गस्त वाढवावी, नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशीही मागणी त्यांनी केली.
या भेटीदरम्यान धनंजय गाडेकर, उत्तमराव मते, गणेश सोमवंशी यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने या घटनेची पारदर्शक चौकशी व्हावी आणि कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी केली.



