Warkari Tradition : विकास लवांडे याला तत्काळ अटक करा; वारकरी संप्रदायाच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन

लवांडे याच्याविरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचा दावा

0
Warkari Tradition : विकास लवांडे याला तत्काळ अटक करा; वारकरी संप्रदायाच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन
Warkari Tradition : विकास लवांडे याला तत्काळ अटक करा; वारकरी संप्रदायाच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन

Warkari Tradition : नगर : विकास लवांडे (Vikas Lawande) यांनी गुरुवर्य, संत आणि महंत यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत त्यांना “घुसखोर” असे संबोधले. संतांनी अनेक पिढ्यांपासून समाजप्रबोधन, समाजसुधारणा आणि अध्यात्मिक क्षेत्रात मोठे योगदान दिले असून अशा वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायाच्या (Warkari Tradition) भावना दुखावल्या गेल्या आहेत. अहिल्यानगर येथे समस्त संत-महंत आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने विकास लवांडे याच्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत पोलीस अधीक्षकांना (Superintendent of Police) निवेदन देण्यात आले आहे.

नक्की वाचा : पिसाळलेल्या लांडग्याचा महिलेवर हल्ला; पाथर्डी तालुक्यातील घटना

लवांडे याच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचा दावा

तसेच विकास लवांडे याच्याविरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. मात्र, गुन्हे दाखल होऊनही अद्याप त्याच्यावर कठोर कारवाई न झाल्याने समाजात चुकीचा संदेश जात असल्याचे संत-महंतांनी म्हटले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आंदोलन करण्याचा इशारा (Warkari Tradition)

निवेदनाद्वारे आरोपीला पुढील २४ तासांत अटक करण्यात यावी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या अध्यक्षांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा संत समाज लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही देण्यात आला आहे. हे निवेदन अशोक पालव यांच्या नेतृत्वाखाली समस्त संत-महंत आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने देण्यात आले.