Wolf Attack : पिसाळलेल्या लांडग्याचा महिलेवर हल्ला; पाथर्डी तालुक्यातील घटना

पिसाळलेल्या लांडग्याने आल्हणवाडी व परिसरातील सुमारे पन्नासहून अधिक शेतकऱ्यांच्या जनावरांनाही चावा घेतल्याची माहिती

0
Wolf Attack : पिसाळलेल्या लांडग्याचा महिलेवर हल्ला; पाथर्डी तालुक्यातील घटना
Wolf Attack : पिसाळलेल्या लांडग्याचा महिलेवर हल्ला; पाथर्डी तालुक्यातील घटना

Wolf Attack : पाथर्डी : तालुक्यातील मणिकदौंडीच्या गर्भगिरी डोंगर (Garbhagiri Hills) पट्ट्यात वसलेल्या आल्हणवाडी येथे पिसाळलेल्या लांडग्याच्या हल्ल्यात (Wolf Attack) एक महिला गंभीर जखमी (Seriously Injured) झाल्याची घटना सोमवारी (ता. ११) पहाटे घडली. द्वारका मच्छिंद्र आढागळे (वय ४५, रा. आल्हणवाडी) असे जखमी महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी वर्गातून मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

नक्की वाचा : १७ व्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सुरेश बनसोडे यांची निवड

Wolf Attack : पिसाळलेल्या लांडग्याचा महिलेवर हल्ला; पाथर्डी तालुक्यातील घटना
Wolf Attack : पिसाळलेल्या लांडग्याचा महिलेवर हल्ला; पाथर्डी तालुक्यातील घटना

डाव्या हाताच्या बोटाला घेतला चावा

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. ११) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास द्वारका आढागळे या घरासमोरील पडवीत झोपलेल्या असताना पिसाळलेल्या लांडग्याने अचानक हल्ला चढविला. यावेळी लांडग्याने त्यांच्या डाव्या हाताच्या बोटाला चावा घेतल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, या पिसाळलेल्या लांडग्याने आल्हणवाडी व परिसरातील सुमारे पन्नासहून अधिक शेतकऱ्यांच्या जनावरांनाही चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

परिसरातील पशुधन धोक्यात (Wolf Attack)

गेल्या अनेक दिवसांपासून या लांडग्याच्या हल्ल्यांमुळे परिसरातील पशुधन धोक्यात आले असून शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे. जनावरांच्या लसीकरणाची गरज निर्माण झाली असून पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.खरेदी-विक्री संघाचे संचालक राधाकिसन कर्डिले यांनी सांगितले की, पिसाळलेल्या लांडग्यामुळे ग्रामस्थ व शेतकरी भयभीत झाले आहेत. अनेक ठिकाणी हल्ले करून हा लांडगा पसार होत असल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी सतर्क राहावे लागत आहे. 

आल्हणवाडी परिसरात लांडग्याची दहशत निर्माण

वन विभागाने तातडीने कारवाई करून या लांडग्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली.या घटनेनंतर गर्भगिरी डोंगर पट्ट्यातील आल्हणवाडी परिसरात लांडग्याची दहशत निर्माण झाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.