FRP | नगर : राज्यातील गाळप हंगाम संपून अनेक दिवस उलटूनही अनेक साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अद्याप 100 टक्के एफआरपीची (FRP) रक्कम अदा करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी थकीत एफआरपी असलेल्या साखर कारखान्यांची सुनावणी घेत कारखानदारांना कडक सूचना दिल्या. 20 मेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात थकीत रक्कम जमा करावी, अन्यथा आरआरसी कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
नक्की वाचा : ओंकार गायकवाड मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा : प्रभावती घोगरे
शेतकऱ्यांची एफआरपी थकीत (FRP)
राज्यातील अनेक साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची एफआरपी थकीत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत अनेक शेतकरी तसेच विविध राजकीय नेत्यांनी साखर आयुक्तांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. शेतकऱ्यांची रखडलेली एफआरपी लक्षात घेऊन साखर आयुक्त कार्यालयात आज विशेष सुनावणी घेण्यात आली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
अन्यथा आरआरसी अंतर्गत कठोर कारवाई (FRP)
या बैठकीला राज्यभरातील 50 हून अधिक साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सुनावणीदरम्यान साखर आयुक्तांनी कारखानदारांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, 20 मेपर्यंत थकीत एफआरपीची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. आदेशांचे पालन न केल्यास संबंधित कारखान्यांवर महसूल वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल.
अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी जाहीर केलेले एफआरपी (FRP)
अगस्ती सहकारी साखर कारखाना, अगस्तीनगर, ता. अकोले – 3000
अशोक सहकारी साखर कारखाना, अशोकनगर, ता. श्रीरामपूर – 3000
लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना, भेंडे, ता. नेवासा – 3000
प्रसाद शुगर अॅण्ड अलाईड अॅग्रो प्रोडक्ट्स, वांबोरी, ता. राहुरी – 3000
पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना, प्रवरानगर, ता. राहाता – 2956
श्री गणेश सहकारी साखर कारखाना लि. रांजणगाव खुर्द ता. राहाता – 3000
सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदा – 3150
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, कोळपेवाडी, ता. कोपरगाव – 3000
मुळा सहकारी साखर कारखाना, सोनई, ता. नेवासा – 3000
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, अमृतनगर, ता. संगमनेर – 3000
सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखाना, सहजानंदनगर, ता. कोपरगाव – 3000
श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, आदिनाथनगर, ता. पाथर्डी – 3000
श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखाना, बोधेगाव, ता. शेवगाव – 3000
इंडीकॉन डेव्हलपर्स, अंबिकानगर, ता. कर्जत – 3100
जयश्रीराम शुगर अॅण्ड अॅग्रो प्रोडक्ट्स, हादगाव, ता. जामखेड – 3000
गंगामाई इंडस्ट्रीज अॅण्ड कन्स्ट्रक्शन बाभुळगाव, ता. शेवगाव – 2950
श्री क्रांती शुगर अॅण्ड पावर, देवीभोयरे, ता. पारनेर – 3100
श्री साईकृपा शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज, हिरडगाव, ता. श्रीगोंदा – 3200
सोपानराव बाळकृष्ण धसाळ, माळकुप, ता. पारनेर – 3001
साजन शुगर, देवदैठण, ता. श्रीगोंदा – 3200
स्वामी समर्थ शुगर अॅण्ड अॅग्रो इंडस्ट्रीज, वरखेडा, ता. नेवासा – 3150



