नगर : सध्या राज्यात भोंदूबाबांचा (The Charlatan) अधिक बोलबाला सुरु आहे. नाशिकमधील भोंदू खरात प्रकरण ताजे असतानाच आता नगरमध्ये (Ahilyanagar Crime) अघोरी बाबाचा प्रताप समोर आला आहे. सोन्याचे आमिष दाखवत घर पाडायला सांगून घराच्या जागेवर बाबाने ताबा मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत एका तरुणाने मंगळवारी पोलिसांकडे तक्रार दाखल केलीय. आता हा भोंदू नेमका कोण आणि नेमकं घडलं काय? ते सविस्तर वाचा…
नक्की वाचा: अहिल्यानगरमध्ये बनावट शॅम्पू रॅकेटचा पर्दाफाश; प्रकरण काय?
नेमकं काय घडलं? (Ahilyanagar Crime)
नगरमधील सर्जेपुरा येथे राहणाऱ्या महेश भास्कर काळोखे यांनी पोलिस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांच्याकडे या प्रकरणी तक्रार दिली आहे. आता घडलं असं की,
तक्रारदार राहत असलेल्या सर्जेपुरा परिसरात शिव अण्णासाहेब सोनवणे हा राहत असून तो स्वतःला अघोरी बाबा समजायचा. जादूटोणा करून तो परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरवण्याचं काम करत होता. घराखाली धन व सोने गाडलेले आहे,असे खोटून सांगून त्याने तक्रादार महेश काळोखे यांना त्याच राहत घर पाडण्यास भाग पाडले. त्याच्या सांगण्यानुसार, तक्रारदार यांनी फेब्रुवारी महिन्यात घरसुद्धा पाडले. मात्र घराखाली कोणतेही धन अथवा सोने आढळून आले नाही. त्यानंतर पूजा, अघोरी विधी व तथाकथित उपाय करण्यासाठी त्याने तक्रारदार यांच्याकडून ५० हजार रुपये उकळले.
अवश्य वाचा: लाडक्या बहिणी प्रतीक्षेत; कधी मिळणार योजनेचे पैसे?
चार जणांविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल (Ahilyanagar Crime)

तक्रारदार यांनी पैसे परत मागितले असता, या भोंदू बाबाने त्यांना धमकावले. तुझे घर आता पाडल आहे, त्यामुळे ती जागा आता माझी आहे. तसेच अघोरी प्रयोग करून तुला संपवून टाकीन, अशी धमकीही त्याने दिली होती, तसेच फिर्यादी व त्यांच्या आईला या प्रकरणी मारहाण केल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे भोंदू शिव सोनवणे याच्याविरोधात जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार महेश काळोखे यांनी याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात दिली.
त्यानुसार शिव अण्णासाहेब सोनवणे, ओम सोनवणे, कोहिनूर सोनवणे (सर्व रा. रंगभवन, सर्जेपुरा), यश सागर सोळशे (रा. बोल्हेगाव) अशा चार जणांविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत आपण देशातील आणि राज्यातील भोंदूंची चर्चा ऐकली आहे, मात्र आता हे भोंदू आपल्या घरापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे सावध व्हा, कुठल्याही आमिषाला बळी पडू नका.



