
नगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी जागतिक तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी आता सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांमध्ये घट करणार (Reduction in vehicles in ministers’ fleet) असल्याची घोषणा केली आहे. तसेच मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या विदेश दौऱ्यावरही काही काळ निर्बंध (Restrictions on Foreign Travel) आणत असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.
नक्की वाचा: नगरमध्ये अघोरीबाबाचा प्रताप, सोन्यासाठी पाडले घर ;नेमकं प्रकरण काय?
जागतिक तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला इंधनाचा वापर जपून करण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी पंतप्रधान मोदींनी खासगी वाहनांचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे. त्याऐवजी मेट्रो, इलेक्ट्रिक बसचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे. यासोबतच वर्क फ्रॉम होम, खाद्य तेलाचा वापर कमी करणे, विदेशात जाणं टाळावं, अशा देखील सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.
अवश्य वाचा: अहिल्यानगरमध्ये बनावट शॅम्पू रॅकेटचा पर्दाफाश; प्रकरण काय?
इंधनाची बचत करायची असल्याने वाहने कमी करण्याचा निर्णय (Devendra Fadnvis)
मंत्र्यांच्या ताफ्यात अनेक वाहने असतात. पण आता इंधनाचा वापर जपून करायचं असल्याने आता ताफ्यातील गाड्या कमी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. तसेच मंत्री असो किंवा बडा अधिकारी, त्यांच्या विदेश दौऱ्यावर तात्पुरते निर्बंध घातले जाणार असल्याची माहिती स्वत: मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
‘पंतप्रधानांनी केवळ सहा महिने मागितलेत’ (Devendra Fadnvis)
मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या गोष्टींमध्ये परकीय चलन कमी होतंय, त्या गोष्टींची खपत कमी कशी होईल, याचा आम्ही प्रयत्न करतोय. आपल्या देशी गोष्टींना वेगवेगळ्या पद्धतीने प्रमोट करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. हे काही एका दिवसांत होणार नाही. पण आपण सर्वांनी एकत्र मिळून प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण पूर्ण करु शकतो. देशाच्या पंतप्रधानांनी केवळ सहा महिने मागितले असतील तर ते न देणं हे अतिशय अयोग्य ठरेल”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.


