NEET | नगर : नीट २०२६ (NEET) पेपरफुटीनंतर ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. तर या संपूर्ण प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आता ही परीक्षा कधी होईल याविषयीची माहिती लवकरच समोर येणार आहे. तत्पूर्वी या पेपरफुटी प्रकरणात नाशिकमधील आरोपीला काल (ता. १२) ताब्यात घेतल्यानंतर आज (ता. १३) सीबीआयच्या पथकाकडून अहिल्यानगर जिल्ह्यात संशयित आरोपींची धरपकडचे सत्र सुरू झाले आहे. अहिल्यानगरमधील एका आरोपीला सीबीआयच्या पथकाने अटक करत न्यायालयात हजर केले.
नक्की वाचा : ओंकार गायकवाड मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा : प्रभावती घोगरे
कनेक्शन पुण्यापर्यंत पोहोचले (NEET)
विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने ही परीक्षा रद्द केली आहे. ३ मे रोजी परीक्षा घेण्यात आली होती. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी निर्णय घेतला गेलाय. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयकडून देण्यात आले आहेत. या प्रकरणाचे कनेक्शन पुण्यापर्यंत पोहोचले आहे. नाशिकमधून अटक केलेल्या शुभम खैरनारचा एक साथीदार पुण्यात असल्याची शक्यता आहे. हा तरुण मूळचा अहिल्यानगर असल्याची माहिती सीबीआयला मिळाली त्यानुसार राहुरीतील धनंजय लोखंडे या युवकाला आज (ता. १३) पहाटे ताब्यात घेण्यात आले. नाशिकच्या नांदगाव मधील आरोपीला अटक केली तेव्हा पोलिसांना लोखंडे याचीही माहिती मिळाली होती. सुरवातीला पुण्यात पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र पुण्यात पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी लोखंडे पुण्याबाहेर पळाला होता. तो अहिल्यानगरमध्ये असल्याची पक्की माहिती मिळताच, पोलिसांनी सापळा रचला आणि त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

चौकशी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात (NEET)
लोखंडे मूळचा अहिल्यानगरचा असला तरी त्याचे वास्तव्य पुण्यात होते आणि येथूनच तो संपर्कात असल्याचा संशय आहे. नाशिकचा आरोपी शुभम खैरनार पकडला गेल्यावर लोखंडे पुण्यात मोबाईल बंद करून बसला होता. पुणे पोलीस मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घेत असताना तो अहिल्यानगरला पळाला. सीबीआयचे पथकही त्याच्या मागावर होते. त्यांच्या सूचनेनुसार पहाटे लोखंडेला अहिल्यानगरमध्ये पकडण्यात आले. तसेच त्याचे साथीदार असल्याच्या संशयातून दोन जण ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीनंतर संशयितांना सोडून देण्यात आले. ही चौकशी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात झाली. त्यानंतर आरोपी लोखंडे याला न्यायालयात हजर केले.
नीट परीक्षेसाठी देशभरातून २२ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. पेपरफुटीचं प्रकऱण समोर आल्यानंतर विद्यार्थी, पालक आणि कोचिंग इंडस्ट्रीतही खळबळ उडाली होती. ४१० प्रश्न विद्यार्थ्यांना मिळाले होते. त्यापैकी जवळपास १२० प्रश्न हे परीक्षेत विचारण्यात आले होते. या प्रकरणी आतापर्यंत १५ जणांना ताब्यात घेतलं आहे.



