Accident : पाथर्डी : तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथील एकाच कुटुंबातील (Family) आई-वडील, मुलगा व मुलगी अशा चौघांचा गुजरातमधील भीषण अपघातात (Accidents) दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याने संपूर्ण पाथर्डी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे पागोरी पिंपळगासह पाथर्डी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नक्की वाचा: दगडफेक करत वाहनाची तोडफोड; तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कार आणि कंटेनरमध्ये जोरदार धडक
पागोरी पिंपळगाव येथील फारुख कडूबाई शेख हे गुजरात राज्यातील वापी येथे बेयर बहुराष्ट्रीय जीवन विज्ञान, औषधनिर्मिती व बियाणे उत्पादन कंपनीमध्ये वरिष्ठ पदावर मागील २७ वर्षांपासून कार्यरत होते. ५ मे रोजी ते पत्नी शबाना फारुख शेख, मुलगा आरिफ फारुख शेख व मुलगी नाजिया फारुख शेख यांच्यासह स्वतःच्या कारने वापी येथून मूळ गावी पागोरी पिंपळगाव (ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) येथे येत होते. दरम्यान गुजरात राज्यातील सुथारपाडा (ता. कपराडा, जि. बलसाड) परिसरात त्यांच्या कार आणि कंटेनरमध्ये जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात पत्नी शबाना शेख व मुलगा आरिफ शेख यांचा जागीच मृत्यू झाला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सहा दिवस मृत्यूशी झुंज (Accident)
अपघातानंतर जखमींना सुथारपाडा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले.अपघातात गंभीर जखमी झालेले फारुख शेख यांना पुढील उपचारासाठी वापी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचीही प्राणज्योत मालवली. तर मुलगी नाजिया फारुख शेख हिच्यावर त्याच रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर ११ मे रोजी तिचाही दुर्दैवी अंत झाला.
पाथर्डी तालुक्यात हळहळ
दरम्यान, फारुख शेख, पत्नी शबाना शेख व मुलगा आरिफ शेख यांच्यावर दुसऱ्या दिवशी रात्री उशिरा त्यांच्या मूळ गावी पागोरी पिंपळगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर मुलगी नाजियाच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर गावात पुन्हा एकदा शोककळा पसरली. या चौघांच्या अकाली निधनाने पागोरी पिंपळगावसह संपूर्ण पाथर्डी तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, नागरिकांकडून शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.



