Radhakrishna Vikhe : कांद्याचे दर कोसळले ही चिंतेची बाब; या संदर्भात सरकार नक्कीच विचार करेल : पालकमंत्री विखे

Radhakrishna Vikhe : कांद्याचे दर कोसळले ही चिंतेची बाब; या संदर्भात सरकार नक्कीच विचार करेल : पालकमंत्री विखे

0
Radhakrishna Vikhe : कांद्याचे दर कोसळले ही चिंतेची बाब; या संदर्भात सरकार नक्कीच विचार करेल : पालकमंत्री विखे
Radhakrishna Vikhe : कांद्याचे दर कोसळले ही चिंतेची बाब; या संदर्भात सरकार नक्कीच विचार करेल : पालकमंत्री विखे

Radhakrishna Vikhe : नगर : राज्यात कांद्याचे दर (Onion Prices) कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिलं झाला आहे. यावर मंत्री राधाकृष्ण विखेंनी सांगितलं की आखाती देशाच्या युद्ध सुरू असतांना देखील सरकारने कुठलीही निर्यात बंदी ठेवलेली नाही. मात्र जगाच संपूर्ण अर्थकारण एका हॉर्मोसवर थांबलेला आहे. आज मुबंई बंदरामध्ये किती शेतीमाल पडून आहे आज कांद्याचे दर कोसळले हे चिंतेची बाब आहे या संदर्भात सरकार नक्कीच विचार करेल परंतु आज निर्यात बंदी नसताना ही आखाती देशात उद्भवलेल्या परिस्थितीला आपल्या सगळ्यांना सामोरें जावे लागेल अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखेनी (Radhakrishna Vikhe) दिली आहे.

नक्की वाचा: इंधन बचतीसाठी महावितरणचे एक पाऊल पुढे; पेट्रोल व डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरु

निवडणुकीतील अपयश झाकण्यासाठी विरोधकांचा आरोप

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यानंतर सरकारवर सामनातुन तसेच काँग्रेसकडून टीका करण्यात आली आहे. विरोधकांच्या टिके उत्तर देत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी राहुल गांधीसह विरोधकांवरचं टीका केली आहे. विखे म्हणाले की, अमेरिकेच्या अप्रत्यक्ष पाठींबा किंवा तेथून येणाऱ्या पैश्यातून सातत्याने देशावर टीका करत होती. त्यामुळे राहुल गांधीनी अमेरिकेच्या राष्ट्रअध्यक्षाला विचारायला पाहिजे की अमेरिकेचे पेट्रोल दर इराण युद्धाच्या पार्शवभूमीवर किती टक्क्याने वाढले आज फक्त भारत देशचं नाही तर सगळं जग हतबल झालेलं आहे.तरी पंतप्रधान मोदींनी वेगवेगळ्या माध्यमातून देशाला इंधन पुरवठा अविरत पणे सुरु ठेवला आणि दर देखील नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र देशाच्या आणि राज्याच्या निवडणुकीत विरोधक तोंडावर आपटले आहे त्यामुळे आपला अपयश झाकण्यासाठी असे आरोप करत आहे. मात्र उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काही निर्णय सरकारला घ्याव्या लागतील अशी प्रतिक्रिया मंत्री विखेंनी दिली आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

मंत्र्यांची हे कर्तव्यच मात्र, जनतेनेही सहकार्य करावे (Radhakrishna Vikhe)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेल आणि इतर खर्चच्या बाबतीत काटकसर करण्याचा आवाहन केल्यानंतर आता राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. इराण अमेरिका युद्धाच्या पार्शवभूमीवर ही परिस्थिती उद्भवलेली आहे. त्यामुळे सरकार जसं पुढाकार घेतो त्यामुळे आता जनतेने देखील पुढाकार घेण्याची गरज आहे. कोविड मध्ये अवघ्या 40 लोकांमध्ये लग्न समारंभ पार पडायचे आता मात्र लग्नात 5 हजार लोकं आणि 200 गाड्या आहे त्यामुळे हे बंधन घालून घेणे हे मंत्र्यांचे कर्तव्य आहे मात्र आता जनतेने सुद्धा काटकसर करण्याची आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया राधाकृष्ण विखेंनी दिली आहे.