पाथर्डी-तिसगावदरम्यान अज्ञात चोरट्याचा हातसाफ; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Theft of Gold Jewelry : पाथर्डी : बीड ते कल्याण या एसटी बसमधून प्रवास (ST Bus Travel) करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील एका महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास (Theft of Gold Jewelry) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सावित्रा बाबादेव बारगजे (रा. दौंड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला आपल्या मुलीसह शिरूर कासार येथून बीड-कल्याण एसटी बसने अहिल्यानगरकडे प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान त्यांनी आपल्या पर्समध्ये सोन्याचे दागिने ठेवले होते.
नक्की वाचा: दगडफेक करत वाहनाची तोडफोड; तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सोन्याचे दागीने व रोख रक्कमेची चोरी
बस पाथर्डीहून पुढे तिसगाव परिसरात पोहोचल्यावर फिर्यादी महिलेचा मोबाईल फोन वाजल्याने त्यांनी पर्स उघडून पाहिली असता त्यामधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर परिसरात शोध घेऊनही साहित्य मिळून न आल्याने अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची खात्री झाली. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये ३ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, अर्धा ग्रॅम वजनाचे सोन्याचे ओम, अर्धा ग्रॅम वजनाची कानातील लहान बाळे, अर्धा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी तसेच अर्धा ग्रॅम वजनाची सोन्याची नथ यांचा समावेश आहे. तसेच पर्समधील रोख रक्कमही चोरीस गेली आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल (Theft of Gold Jewelry)
या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.



