Education Department Meetings : शिक्षण विभागाच्या बैठकीत शिक्षक संघटनांचा संताप; अडवणूक व आर्थिक त्रासाच्या तक्रारींचा पाढा

0
Education Department Meetings : शिक्षण विभागाच्या बैठकीत शिक्षक संघटनांचा संताप; अडवणूक व आर्थिक त्रासाच्या तक्रारींचा पाढा

कार्यालयीन अधीक्षकांच्या बदली अथवा निलंबनाची मागणी; शिक्षक आमदारांनी घेतले फैलावर

Education Department Meetings : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी (Principals, Teachers, and Non-teaching Staff) यांच्या विविध प्रलंबित प्रश्‍नांबाबत शुक्रवारी (दि. 15 मे) नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे (MLC Kishor Darade) यांच्या उपस्थितीत विशेष बैठक (Education Department Meetings) पार पडली. शहरातील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीत शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसमोर आपल्या अडचणींचा पाढा वाचत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

नक्की वाचा : राहुरी खुर्दमध्ये पाणीप्रश्न पेटला; ग्रामपंचायत कार्यालयाला महिलांनी ठोकले कुलूप

मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित

बैठकीस जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, वेतन पथक अधीक्षक रामदास म्हस्के, उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर, संध्या भोर यांच्यासह माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब शिंदे, मुख्याध्यापक संघाचे सचिव मिथून डाेंगरे, संभाजी पवार, जुनी पेन्शन कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे, शिक्षक नेते अशोकराव आव्हाड, प्रा. सुनील पंडित, अमोल ठाणगे, रवी गावडे, , तौसिफ शेख, उमेश शिंदे, प्रसाद सामलेटी, संजय थोरात, रवींद्र डमाळे, देवढे सर, दिलीप काटे आदींसह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

प्रशासकीय विलंब, आर्थिक अडचणीबाबत मांडणी (Education Department Meetings)

आमदार दराडे यांचे स्वीय सहाय्यक हरीश मुंडे व वैभव सांगळे यांच्या पुढाकारातून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीदरम्यान शिक्षकांनी त्यांच्या दैनंदिन कामकाजातील अडचणी, प्रशासकीय विलंब, आर्थिक अडचणी तसेच विभागीय स्तरावरील त्रुटींबाबत सविस्तर मांडणी केली. अनेक प्रश्‍न दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली.

Education Department Meetings : शिक्षण विभागाच्या बैठकीत शिक्षक संघटनांचा संताप; अडवणूक व आर्थिक त्रासाच्या तक्रारींचा पाढा
Education Department Meetings : शिक्षण विभागाच्या बैठकीत शिक्षक संघटनांचा संताप; अडवणूक व आर्थिक त्रासाच्या तक्रारींचा पाढा

प्रलंबित मुख्याध्यापक मान्यता, निवडश्रेणी मान्यता, अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन या प्रश्‍नांवर चर्चा करत आमदार दराडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. तसेच रोस्टर तपासणीतील विलंब, संचमान्यतेतील त्रुटी दुरुस्तीचे रखडलेले प्रस्ताव, अनुकंपा नियुक्ती मान्यता, रजा कालावधीत नियुक्त शिक्षकांच्या मान्यतेसंदर्भातील अडचणी यावरही अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
शालार्थ प्रणालीमध्ये पोस्ट क्रिएशन, जन्मतारीख व नियुक्ती दिनांक दुरुस्तीसाठी शिफारशी उशिरा मिळणे, प्रस्ताव अडवून ठेवणे, पीएफ पावत्या, न परतावा व अंतरीम प्रलंबित पावत्या, प्रलंबित वैद्यकीय बिले तसेच एनपीएसमधील रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग करताना होणारा विलंब या विषयांवर शिक्षक व कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी आमदार दराडे यांनी सर्व प्रश्‍नांवर सकारात्मक चर्चा करत ते निकाली काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

बैठकीत उपस्थित शिक्षक व कर्मचाऱ्यांनी प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन प्रलंबित प्रश्‍न सोडवावेत, अशी मागणी केली. तर आमदार दराडे यांनी शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे, अन्यथा पुढील काळात अधिक कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशाराही दिला.

कार्यालयीन अधीक्षकांविरोधात शिक्षक संघटनांचा संताप

बैठकीत माध्यमिक शिक्षण विभागातील कार्यालयीन अधीक्षकांविरोधात शिक्षक संघटनांनी गंभीर आरोप केले. फायली मंजूर करण्यासाठी अडवणूक केली जाते, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आर्थिक व्यवहारासाठी त्रास दिला जातो, अशा तक्रारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडल्या. काही महिला कर्मचाऱ्यांनीही अडवणूक होत असल्याचे बैठकीत स्पष्टपणे सांगितले. यामुळे संबंधित कार्यालयीन अधीक्षकांचे निलंबन अथवा बदली करण्याची मागणी शिक्षक संघटनांच्या वतीने करण्यात आली. बैठकीस अनुपस्थित असलेल्या कार्यालयीन अधीक्षकांना तात्काळ संपर्क साधून बैठकीत बोलावून घेण्यात आले. त्यानंतर शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी संबंधित अधिकाऱ्याला चांगलेच फैलावर घेत, यापुढे अशा प्रकारच्या तक्रारी येऊ नयेत, अशी कठोर समज दिली.