Knocked lock: राहुरी खुर्दमध्ये पाणीप्रश्न पेटला; ग्रामपंचायत कार्यालयाला महिलांनी ठोकले कुलूप

प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

0

Knocked lock:राहुरी: राहुरी खुर्द येथे तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावरून ग्रामस्थांचा संताप अनावर झाला असून संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून (Knocked lock) जोरदार आंदोलन छेडले. गेल्या अनेक दिवसांपासून गावात पाणीपुरवठा वेळेवर होत नसल्याने नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत असल्याने अखेर महिलांनी ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली.

अवश्य वाचा- बोगस बियाणे, खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करा : पालकमंत्री विखे पाटील

प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह (Knocked lock)

“जोपर्यंत गावातील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप उघडू देणार नाही,” असा इशारा आंदोलनकर्त्या महिलांनी दिला. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच उपस्थित नसल्याने महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच ग्रामपंचायत सदस्यही कार्यालयात अनुपस्थित असल्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महिलांनी सांगितले की, “आम्ही नियमितपणे व वेळेवर पाणीपट्टी भरत आहोत. मात्र, तरीही नागरिकांना पुरेसा व नियमित पाणीपुरवठा मिळत नाही. अनेकदा दोन-दोन दिवस नळाला पाणी येत नाही. पाण्यासाठी रात्रभर जागरण करावे लागत आहे.” यामुळे महिलांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

दरम्यान, ग्रामपंचायतीकडून “१४ गाव पाणीपुरवठा योजनेची पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने भरत नसल्यामुळे गावाला कमी दाबाने पाणीपुरवठा होत नाही,” असे कारण सांगण्यात आले. मात्र ग्रामस्थांनी हे कारण मान्य करण्यास नकार देत प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.
आंदोलनावेळी १४ गाव पाणीपुरवठा योजना सदस्य शिवाजी शेंडे, शौकत इनामदार, ग्रामविकास अधिकारी प्रभाकर चव्हाण,आयुब पठाण व ग्रामपंचायत सदस्य राम तोडमल, आश्विनी कुमावत, असफ पठाण आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थ महिलांनी प्रशासनाला धारेवर धरत पाणीप्रश्न तात्काळ सोडविण्याची मागणी केली.