Nagar : नगर : अहिल्यानगरमधील ‘घर घर लंगर सेवा परिवारा’तील अत्यंत सक्रिय, समर्पित सेवाधारी आणि सर्वांचे लाडके व्यक्तिमत्त्व सरदार प्रिथपालसिंग धुप्पर (वय ६४) यांचे नुकतेच व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. एक मित्र, मार्गदर्शक, स्पष्टवक्ते आणि अत्यंत विनोदी स्वभावाचेव्यक्तीमत्व असलेल्या धुप्परजींबद्दल समाजातील प्रत्येक घटकाच्या मनात एक विशेष आदर आणि आपुलकीचे स्थान होते. त्यांचे हसमुख व्यक्तिमत्त्व आणि सेवेची ओढ यामुळे ते सर्वांचे मार्गदर्शक बनले होते.
हेही वाचा : ८८५ कोटी रुपयांच्या अंतिम आराखड्यास मंजुरी; जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक
कोविड काळात अविरत अन्नसेवा
२०२१ मध्ये जेव्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशाला कचाट्यात घेतले होते, तेव्हा गरजू आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ‘घर घर लंगर सेवा’ सुरू ठेवण्यात सरदार प्रिथपालसिंग धुप्पर यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्याच विशेष पुढाकारातून लंगर सेवेसाठी ‘हॉटेल अशोका’ची जागा उपलब्ध झाली. त्यांच्या या नियोजनामुळेच त्या कठीण काळात हॉटेल अशोका येथून वर्षभराहून अधिक काळ अखंड, अविरतपणे स्वयंसेवी अन्नसेवा सुरू राहिली.
नक्की पहा : शनिअमावस्या व शनिजयंतीचा दुर्मिळ योग एकत्र आल्याने शनिशिंगणापूरात भक्तांचा महापूर
सेवेचा अनोखा वस्तूपाठ (Nagar)
धुप्परजींचा सेवेप्रती असलेला प्रामाणिकपणा थक्क करणारा होता. घर घर लंगर सेवेमधील संध्याकाळच्या अन्नसेवेत त्यांनी कधीही, एकही दिवस खंड पडू दिला नाही. दैनंदिन जीवनातील व्यस्ततेमधून वेळ काढत ते रोज सायंकाळी ५ वाजता न चुकता सेवास्थळी उपस्थित राहत असत. तिथे दररोज २०० हून अधिक अन्नपॅकेट्स स्वतः उभं राहून पॅक करण्याच्या सेवेत ते अतिशय आनंदाने सहभागी होत असत.



