Waqf Board : श्रीगोंद्यातील संत शेख महंमद देवस्थानची वक्फ बोर्डाकडील नोंद रद्द करा ; धर्मादाय उप आयुक्तांचे आदेश

वक्फ बोर्डाकडील नोंदणी योग्य असल्याचा दावा

0
Waqf Board : श्रीगोंद्यातील संत शेख महंमद देवस्थानची वक्फ बोर्डाकडील नोंद रद्द करा ; धर्मादाय उप आयुक्तांचे आदेश
Waqf Board : श्रीगोंद्यातील संत शेख महंमद देवस्थानची वक्फ बोर्डाकडील नोंद रद्द करा ; धर्मादाय उप आयुक्तांचे आदेश

Waqf Board : श्रीगोंदा : तालुक्यासह शहरातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘संत शेख महंमद बाबा देवस्थान’ (Sant Sheikh Muhammad Baba Shrine) (शेख महंमद बाबा दर्गा ट्रस्ट, ई-७१) च्या संदर्भात देवस्थानची वक्फ बोर्डाकडे (Waqf Board) झालेली ‘पोकळ’ नोंद रद्द करण्यासाठी दोन महिन्यांच्या आत वक्फ बोर्डाकडे अर्ज सादर करावा, असा स्पष्ट आदेश अहिल्यानगरचे धर्मादाय उप आयुक्त नवनाथ जगताप (Navnath Jagtap) यांनी ट्रस्टच्या विश्वस्तांना दिला आहे.

नक्की वाचा : चालू आवर्तनाकडे लागल्या शेतकऱ्यांच्या नजरा; पाणी मागणी अर्ज भरून घेण्याची मागणी

पडताळणी केल्यानंतर हा निर्णय देण्यात आल्याची माहिती

या संदर्भात घनश्याम शेलार यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० कलम ४१ अ अंतर्गत चौकशी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि कागदपत्रांची सखोल पडताळणी केल्यानंतर हा निर्णय देण्यात आल्याची माहिती घनश्याम शेलार यांनी पत्रकार परिषद घेत दिली. या सुनावणी दरम्यान अर्जदार घनश्याम शेलार यांनी असा युक्तिवाद केला होता की, सदर देवस्थान हे दर्गा नसून ‘मठ’ आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

वक्फ बोर्डाकडील नोंदणी योग्य असल्याचा दावा (Waqf Board)

१६ व्या शतकात संत शेख महंमद महाराजांनी भागवत धर्माचा स्वीकार करून मराठीत ‘योगसंग्राम’ सारख्या ग्रंथांची रचना केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी महाराजांच्या आध्यात्मिक कार्यासाठी हा मठ बांधून देऊन जमीन इनाम दिली होती. येथे आजही वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने उत्सव साजरे होतात. तर दुसरीकडे विश्वस्त शेख अमीन हुसेन व इतरांनी हे ठिकाण संजीवन समाधी नसल्याचे सांगत वक्फ बोर्डाकडील नोंदणी योग्य असल्याचा दावा केला होता.

न्यायमूर्ती किंवा फोरमसमोर दाद मागण्याची मुभा

यावर धर्मादाय उप आयुक्तांनी स्पष्ट केले की, कलम ४१ अ अंतर्गत केवळ प्रशासकीय स्वरूपाचे आदेश देता येतात, कोणत्याही जागेचा ‘मठ’ की ‘दर्गा’ असा न्यायिक निवाडा करण्याचा अधिकार या कलमांतर्गत येत नाही. त्यासाठी संबंधितांना योग्य त्या न्यायमूर्ती किंवा फोरमसमोर दाद मागण्याची मुभा असल्याचे सांगितले.धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप यांनी १५ मे २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशात १९५३ मध्ये या न्यासाची नोंदणी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे (ई-७१) झाली होती. या देवस्थानचे सर्व आर्थिक आणि व्यवस्थापकीय व्यवहार सुरुवातीपासूनच अहिल्यानगर धर्मादाय उप आयुक्त कार्यालयाकडे नोंदणीकृत आहेत.

वक्फ बोर्डाकडे रीतसर अर्ज सादर करणे आवश्यक

२००८ मध्ये वक्फ बोर्डाकडे झालेली नोंदणी ही केवळ कागदोपत्री आणि पोकळ ठरते, मूळ रेकॉर्ड कधीही वक्फ बोर्डाकडे हस्तांतरित झालेले नाही. वक्फ बोर्डाकडे झालेली नोंद कायदेशीर प्रक्रियेला बगल देऊन केल्याचे समोर आले असून, त्यामुळे न्यासाच्या व्यवस्थापनावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून कलम ४१ अ अंतर्गत वक्फ बोर्डाकडील नोंदणी रद्द करण्यासाठी विश्वस्तांनी आगामी दोन महिन्यांच्या आत वक्फ बोर्डाकडे रीतसर अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

संत शेख महंमद महाराज यात्रा उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित

शेख महंमद बाबा दर्गा ट्रस्ट (ई-७१)’ या न्यासाच्या विश्वस्तांना न्यासाची वक्फ बोर्डाकडे ‘MSBW/-20/-08’ अन्वये झालेली पोकळ/चुकीची नोंदणी रद्द करण्याबाबत तत्काळ ठराव मंजूर करावा असे निर्देशित करण्यात आले असल्याचे सांगितले. यावेळी गोपाळराव मोटे, सुदाम झुंजरूक, अनिल औटी, दादासाहेब औटी, अशोक आळेकर, नवनाथ दरेकर, संजय आनंदकर, बाळासाहेब दुतारे आयुब शेख यांच्यासह संत शेख महंमद महाराज यात्रा उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.