Shani Jayanti: नेवासा: शनिअमावस्या व शनिजयंतीचा (Shani Jayanti) दुर्मिळ योग एकत्र आल्याने शनिशिंगणापूर येथे आज (ता.१६) शनैश्वर दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांच्या गर्दीचा महापूर उसळला होता. दिवसभरात सुमारे ६ ते ७ लाख भाविकांनी शनिदेवाचा जयजयकार करत दर्शन घेतले. राज्य परराज्यासह देशभरातून आलेल्या लाखो भाविकांनी शनि दर्शनासाठी गर्दी केली. उन्हाचा प्रचंड तापमानात सुद्धा भक्ती आणि शक्तीचा शनिशिंगणापुरात महापूर लोटला. लाखो भक्त शनी चरणी नसतं मस्तक झाले. “ओम नीलांजन समाभासंम रविपुत्रमं यमाग्रजम, छाया मार्तंड संभूतंम ओम नमामि शनैश्वराय नमः. शनि देवाच्या जयजय कराने संपूर्ण आसमंत उजळून निघाला. दर्शन रांग मंदिराच्या बाहेर लागल्याने भाविकांना दर्शनासाठी थांबवावे लागले. पहाटेचच्या आरतीपासून भाविकांच्या झुंडीच्या झुंडी शनी मंदिरात दाखल झाले. दुपारपर्यंत पाच लाखाहून अधिक भाविकांनी शनि दरबारी हजेरी लावली.
अवश्य वाचा- ८८५ कोटी रुपयांच्या अंतिम आराखड्यास मंजुरी; जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक
पवित्र गंगाजलाने शनि महाराजांना जलअभिषेक (Shani Jayanti)
आज पहाटे शनि अमावस्यास प्रारंभ झाल्याने पहाटची आरती शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, पंकज पटेल गुजरात श्रीनाथ भीमले पुणे यांच्या हस्ते पार पडली. दुपारी बारा वाजता शनि जन्मावेळी प्रवरा संगम येथून आणलेल्या पवित्र गंगाजलाने शनि महाराजांना जलअभिषेक घालण्यात आला. यावेळी पंचामृताने मूर्तीला स्नान घालण्यात आले. नीलवस्त्र सुवर्णालंकार सोन्याचा मुकट परिधान करून साज चढवला. यावेळी दुपारची मध्यान मुख्य आरती सोहळा ऑस्ट्रेलिया येथील शनि भक्त राकेश कुमार व सौरभ बोरा यांच्या हस्ते झाला. यावेळी आरती सोहळा पाहण्यासाठी चौथरा जवळ हजारो भाविकांनी हजेरी लावली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
City & Local Guides
सकाळपासूनच भाविकांच्या ओघ शनी मंदिराकडे सुरू होता. मंदिराकडे येणाऱ्या चारही मार्गाने भाविक दाखल झाले. गर्दी प्रचंड झाल्याने शिडी मार्गे येणारी वाहने मुळा साखर कारखान्याचे वाहनं तळावर तसेच पुणे संभाजीनगर वरून येणाऱ्या वाहनांसाठी ग्रामीण रुग्णालय येथे सर्व वाहने थांबवण्यात आले. तेथून भाविकांना पायी चालत यावे लागले. मंदिरात अभिषेक भावनात पूजा पाठ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होत होते. शनि मूर्तीवर तेलाचा प्रचंड अभिषेक सुरू होता. शनि अमावस्या व शनी जयंती मुळे भाविकांची होणारे प्रचंड गर्दी लक्षात घेता देवस्थान प्रशासनाने केवळ मुख्य महाद्वाराधूनच प्रवेश दिल्याने भाविकांची दर्शन रांगेत गर्दी झाली. एकच गेट मधून भाविकांना प्रवेश दिल्याने गावकरी गेट व गेट क्रमांक २ बंद ठेवल्याने मोठ्या प्रमाणात भाविकांची गैरसोय झाली. गावकरी गेट व गेट क्रमांक दोन येथे भाविक व सुरक्षा रक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बचाबाची झाली तसेच व्हीआयपी मार्गवर मोठा गोंधळ उडाला.



