Monsoon : मान्सून सक्रियतेबाबत अनिश्चितता; अवैध पाणी उपसा थांबवण्याचे आवाहन

गावांना सुरळीत पाणी पुरवठा वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना

0
Monsoon : मान्सून सक्रियतेबाबत अनिश्चितता; अवैध पाणी उपसा थांबवण्याचे आवाहन
Monsoon : मान्सून सक्रियतेबाबत अनिश्चितता; अवैध पाणी उपसा थांबवण्याचे आवाहन

Monsoon : कर्जत : अलनीनोच्या प्रभावामुळे मान्सून (Monsoon) सक्रिय बाबत अनिश्चितता निर्माण झाली असून कर्जत तालुक्यातील नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर जपून करावा. यासह वाढत्या उन्हाच्या तापमानामुळे (Due to the heat) उपलब्ध पाणीसाठ्याचे बाष्पीभवन (Evaporation) मोठ्या प्रमाणात होत असून नैसर्गिक पाण्याच्या जलस्रोताची पातळी कमालीची खाली जात असल्याने या उदभवावरील अनधिकृत अवैध पाणी उपसा संबंधित शेतकऱ्यांनी करणे थांबवावे असे आवाहन कर्जतचे प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी केले आहे.

नक्की वाचा : नगर-मनमाड महामार्गावर पुन्हा अपघात; गेल्या पाच दिवसात गेला दुसरा बळी

काही गावात पाणीटंचाईची गडद समस्या

प्रांताधिकारी पाटील यांनी सोमवारी (ता. १८) दुरगाव (ता.कर्जत) तलावाची पाहणी करीत तालुका प्रशासनाच्या टंचाई विभागास काही सूचना देत त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. मागील वर्षी मान्सून पावसाच्या जोरदार हजेरीमुळे कर्जतच्या बहुतांश नदी-नाले, ओढे, तलाव बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला होता. यासह परिसरातील विहीर, बोअरवेलला देखील पाण्याचे प्रमाण अधिक होते. यंदा उन्हाने तब्बल ४२ अंशचा पारा गाठला असून यामुळे पाण्याची पातळी कमालीची खालावली जात असल्याचे चिन्हे निदर्शनास येत आहे. यामुळे कर्जत तालुक्यातील मोजक्या काही गावात पाणीटंचाईची गडद समस्या उभी राहिली असून आजमितीस कर्जत तालुक्यातील ९ गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

अवैध पाणी उपसा होत असल्याच्या तक्रारी (Monsoon)

सध्या हवामान खात्याच्या निर्देशानुसार अलनीनोच्या प्रभावामुळे मान्सून सक्रियबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्जत तालुका टंचाई विभाग आणखी सतर्क ठेवण्याच्या सूचना प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी सोमवारी (ता. १८) तालुका प्रशासनास दिल्या आहेत. नैसर्गिक पाण्याच्या जलस्रोताच्या ठिकाणी मोटारीद्वारे अवैध पाणी उपसा होत असल्याच्या तक्रारी प्रशासनास प्राप्त होत असल्याने पाटील यांनी महावितरण, कुकडी, लघुपाटबंधारे, पोलीस प्रशासन यासह टंचाई विभागास संयुक्त कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सर्वसामान्य शेतकऱ्यांनी देखील आपल्या मोटारी बंद करून अवैध पाणी उपसा करणे थांबवावे असे आवाहन केले आहे.

पाणी पुरवठा वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना

प्रांताधिकारी पाटील यांनी दुरगाव (ता.कर्जत) येथील तलावाची पाहणी करीत खाजगी ठिकाणाहुन टँकर भरणाऱ्या उदभवास देखील भेट देत पाणी खेपा पूर्ण क्षमतेने भरत प्रस्ताव प्राप्त झालेल्या मुळेवाडी, डिकसळ, कापरेवाडी, खांडवी, कौडाणे, पिंपळवाडी, धालवडी, राक्षसवाडी खुर्द आणि सोनाळवाडी या गावांना सुरळीत पाणी पुरवठा वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना टँकर चालकांना दिल्या. तसेच मान्सून सक्रिय होईपर्यंत कर्जत तालुक्यातील नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावे असे आवाहन केले.