Accident : नगर-मनमाड महामार्गावर पुन्हा अपघात; गेल्या पाच दिवसात गेला दुसरा बळी

दुचाकीच्या हॅन्डला अचानक कट मारल्यानेडोके हे आपल्या दुचाकीसह कोसळले रस्त्यावर

0
Accident : नगर-मनमाड महामार्गावर पुन्हा अपघात; गेल्या पाच दिवसात गेला दुसरा बळी
Accident : नगर-मनमाड महामार्गावर पुन्हा अपघात; गेल्या पाच दिवसात गेला दुसरा बळी

Accident : राहुरी : नगर-मनमाड महामार्गावर (Nagar-Manmad Highway) राहुरी कृषी विद्यापीठ परिसरात शनिवारी (ता. १६) सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास कंटेनर व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात (Accident) एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू (Death) झाला. या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. कंटेनरच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वार मधुकर डोके हे जागीच ठार झाले. मागील पाच दिवसांत नगर-मनमाड महामार्गावरील हा दुसरा बळी ठरला आहे.

नक्की वाचा : फॉरेस्ट जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात कुत्तरवाडी ग्रामस्थांचा तहसीलवर मोर्चा; कारवाईची मागणी

डोके हे आपल्या दुचाकीसह कोसळले रस्त्यावर

राहुरी कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर नगर-मनमाड महामार्गावरील रस्त्याचे काम सुरू असल्याने सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यातच शनिअमावास्यानिमित्त शनिभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी आणि अवजड वाहनांची वर्दळ असल्याने महामार्गावर मोठया प्रमाणात गर्दी होती. याच दरम्यान मधुकर गुलाब डोके, (वय ४८ वर्षे रा. बेलवंडी, ता. श्रीगोंदा) हे आपल्या दुचाकीवरून राहुरीच्या दिशेने जात होते. ते गुहा येथील त्यांच्या भाच्याकडे जात होते. विद्यापीठ गेट समोर समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीच्या हॅन्डला अचानक कट मारल्याने ते आपल्या दुचाकीसह रस्त्यावर कोसळले. त्याचवेळी शेजारून जात असलेला कंटेनरच्या मागील चाकाखाली ते सापडल्याने व त्यांच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त (Accident)

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तसेच रुग्णवाहिका आणि पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली. त्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे राहुरी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. या भीषण अपघातामुळे नगर-मनमाड महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.महात्मा फुले कृषी विद्यापिठाच्या सुरक्षारक्षकांनी वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले. मागील पाच दिवसांत नगर-मनमाड महामार्गावरील हा दुसरा बळी ठरला आहे. यापूर्वी १२ मे रोजी राहुरी खुर्द येथे दोन दुचाकींच्या अपघातात एका १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. नगर मनमाड महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.