Election | विधान परिषदेच्या राज्यातील अहिल्यानगरसह १६ रिक्त जागेसाठी निवडणूक जाहीर

0
Election
Election

Election | नगर : राज्यात लवकरच विधान परिषदेच्या १७ रिक्त जागांसाठी निवडणूक (Election) होण्याची शक्यता आहे. आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषदेच्या १७ जागांसाठी १८ जूनला मतदान तर २२ जूनला मतमोजणी होणार आहे. यामध्ये मागील दोन वर्षांहून अधिक काळ रिक्त असलेल्या अहिल्यानगर (Ahilyanagar) स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेचाही समावेश आहे.

हे वाचा – बेलवंडी पोलिसांनी पकडला ‘श्रीगोंदा’ हद्दीतील गुटखा; नूतन एसपींच्या आदेशाने कारवाई

अहिल्यानगरच्या जागेसाठी निवडणूक (Election)

जिल्ह्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूण ५६९ मतदारांपैकी ४६१ सदस्य कार्यरत आहेत. हे प्रमाण ८२.४७टक्के असून, विधानपरिषद निवडणुकीच्या नियमानुसार ते ७५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने अहिल्यानगरच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या १७ जागांसाठी लवकरच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असून, त्यात अहिल्यानगरचा समावेश असेल. मात्र, या जागेबाबतचा अंतिम निर्णय केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाकडून घेण्यात येईल. असे असले तरी, नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांनंतर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी (नगरसेवक) आणि कार्यरत जागांचा सविस्तर तपशील राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक शाखेकडून मागवून घेतला होता. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानपरिषदेतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागेची निवडणूक जाहीर केली आहे.

नक्की वाचा : शनी अमावस्येनिमित्त मढीत उसळला नाथभक्तांचा जनसागर; दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी

जागा रिक्त राहिल्या (Election)

अहिल्यानगर जिल्ह्यात विधान परिषदेसाठी मतदार असणारे जिल्हा परिषदेचे ७५ सदस्य आणि पंचायत समितीचे १४ सभापती अशी एकूण ८९ पदे सध्या रिक्त आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका वेळेत न झाल्यामुळे या जागा रिक्त राहिल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायती, नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुका पूर्ण झाल्या आहेत.

हे पहा – लोखंडांवर घाव घालणाऱ्या हातांनी मिळविले युपीएससीत यश; अक्षय पवार यांची प्रेरणादायी यशोगाथा

अहिल्यानगर जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती अशा १६ स्थानिक संस्थांचे ४६१ सदस्य (नगरसेवक) सध्या कार्यरत आहेत. या सर्व सदस्यांना विधानपरिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य नसले, तरी एकूण कार्यरत सदस्यांची टक्केवारी ८२ टक्क्यांवर असल्याने निवडणूक घेण्यातील मुख्य तांत्रिक अडचण दूर झाल्याने ही निवडणूक होणार आहे.

असे आहे मतदार (Election)

महापालिका नगरसेवक – ७३

नगरपालिका नगरसेवक – ३१२

नगरपंचायत नगरसेवक – ७६

एकूण कार्यरत मतदार – ४६१

निवडणूक कार्यक्रम (Election)

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस – १ जून २०२६

उमेदवारी अर्ज छाणनी – २ जून २०२६

उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस – ४ जून २०२६

मतदानाचा दिवस – १८ जून २०२६ (सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत)

मतमोजणी प्रक्रिया – २२ जून २०२६

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here