Madhi : पाथर्डी : शनी अमावस्येनिमित्त (Shani Amavasya) श्री क्षेत्र मढी (Madhi) येथे चैतन्य कानीफनाथ महाराजांच्या दर्शनासाठी तसेच मायंबा (Mayamba) येथील मच्छिंद्रनाथ गडावरील संजीवन समाधी दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून लाखो नाथभक्तांनी गर्दी केली होती. नाशिक, बीड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई, ठाणे आदी भागांसह राज्याच्या विविध जिल्ह्यांतून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते.
नक्की वाचा : चोरट्यांच्या मारहाणीत शेतकऱ्याचा जागीच मृत्यू; पारनेर तालुक्यातील घटना

सर्वच मार्गांवर वाहनांच्या रांगा
शुक्रवारी (ता. १५) रात्रीपासूनच भाविकांचा ओघ सुरू झाला होता. पहाटेपासून मढी, मायंबा, वृद्धेश्वर, मोहटादेवी तसेच देवी धामणगाव परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. मंदिर परिसराकडे जाणाऱ्या सर्वच मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. प्रचंड गर्दीमुळे मढीसह तिसगाव, निवडुंगे, पाथर्डी परिसरात वाहतूक विस्कळीत झाली होती. बेसिस्त वाहने उभी करण्यात आल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
विविध ठिकाणी मंडप व ताडपत्री आच्छादनाची व्यवस्था (Madhi)
मढी येथे पहाटेच्या महाआरतीनंतर गडाच्या पूर्व दरवाज्यासमोर दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रस्त्यांवरील अतिक्रमणे व काही ठिकाणी आडवी-तिडवी लावण्यात आलेली वाहने यामुळे भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागला. रखरखत्या उन्हातही नाथभक्तांची मांदियाळी दर्शनासाठी कायम होती. उन्हाच्या झळा भाविकांना लागू नयेत यासाठी विविध ठिकाणी मंडप व ताडपत्री आच्छादनाची व्यवस्था करण्यात आली होती. मोहटादेवी येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना गारवा मिळावा म्हणून दर्शन बारीच्या मुख्य प्रवेशद्वारावर पाण्याचे स्पिंकलर लावून बारीक फवाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमामुळे भाविकांना उन्हातही काहीसा दिलासा मिळत होता.
संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला
मोहटादेवी येथे मोहटा देवीच्या दर्शनासाठी तर देवी धामणगाव येथे रेणुकादेवीच्या दर्शनासाठीही नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मढी येथे दर्शनासाठी आलेल्या अनेक भाविकांनी मच्छिंद्रनाथ गड व वृद्धेश्वर येथेही दर्शनाचा लाभ घेतला. शनी अमावस्येची पर्वणी साधत नाथभक्तांनी संजीवन समाधीसमोर माथा टेकवत भक्तिभाव व्यक्त केला. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता



