Belvandi Police : श्रीगोंदा : अहिल्यानगरचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन (Mummaka Sudarshan) यांच्या थेट आदेशाने बेलवंडी पोलिसांनी (Belvandi Police) श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या (Shrigonda Police Station) हद्दीतील आढळगाव आणि लोणी व्यंकनाथ परिसरात गुटखा व्यावसायिकांवर कारवाई केली. या कारवाईत तब्बल चार लाख ५० हजार रुपये किंमतीच्या सुगंधी सुपारीसह तंबाखू, गुटखा, तीन वाहने जप्त केली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून तीन जण पसार झाले.
नक्की वाचा : शनी अमावस्येनिमित्त मढीत उसळला नाथभक्तांचा जनसागर; दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी
जिल्हा पोलीस प्रमुखांनी उचलली कडक पावले
शरद सीताराम वडवकर (रा. लोणी व्यंकनाथ), नागेश निळकंठ सुमकवर (रा. झेंडा चौक, श्रीगोंदा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अहिल्यानगरचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्याचे सूत्र हाती घेताच अवैध व्यवसायावर वक्र दृष्टी दाखविली असून अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांनी कडक पावले उचलली आहे. श्रीगोंदा शहरासह ग्रामीण भागात गुटख्याची राजरोस वाहतूक आणि विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती थेट एसपी कार्यालयाला मिळाली. त्यानुसार एसपींनी बेलवंडी पोलीस ठाण्यातील पथकाला थेट कारवाईचे आदेश दिले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
गुटख्याचे मोठे नेटवर्क सक्रिय (Belvandi Police)
स्थानिक श्रीगोंदा पोलीस किंवा स्थानिक गुन्हे शाखा यांना या कारवाईची साधी भणकही लागू न देता गुटखा विक्रीवर कारवाई करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात गुटख्याचे मोठे नेटवर्क सक्रिय आहे. स्थानिक पोलिसांच्या नाकाखाली हा कोट्यवधींचा काळाबाजार सुरू असताना पोलीस प्रशासनाला याची माहिती कशी नव्हती? राजकीय दबाव की अन्य काही कारणामुळे पोलीस गप्प होते? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. तर कारवाईची कुणकुण लागताच मुख्य सुत्रधार रवि बबन दळवी, अक्षय राजू होले (रा. आढळगाव) आणि प्रवीण सतीश गायकवाड हे तिघे पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाले आहेत.



