Gavathi Katta: गावठी कट्टे बाळगणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद; कर्जत पोलिसांची कारवाई 

जिल्हा अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

0

Gavathi Katta: कर्जत: माहीजळगाव (ता.कर्जत) शिवारात गावठी कट्टे (Gavathi Katta) बाळगणारा युवक मुद्देमालासह कर्जत पोलिसांनी जेरबंद केला. नागेश्वर उर्फ नागेश महेंद्र पावरा असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (ता.१७) कर्जत पोलीस उपविभागाचे पथक गस्त करीत असताना पोलीस कर्मचारी अमोल भैलुमे यांना चापडगाव ते माहीजळगाव हायवे रोडलगत कर्जत फाटा येथे एक युवक उभा असून त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याची माहिती मिळाली. सदरची माहिती भैलुमे यांनी तात्काळ पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांना दिली. प्राप्त माहितीची शहानिशा करून त्याची चौकशी केली असता प्रथमदर्शनी त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली.

अवश्य वाचा- गळफास घेत ३५ वर्षीय व्यक्तीने संपवले जीवन; राहुरी फॅक्टरी येथील घटना

जिल्हा अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई (Gavathi Katta)

मात्र, पोलिसांनी त्याची झाडाझडती घेतला असता त्याच्या पाठीवरील बॅगेत कर्जत पोलिसांना दोन गावठी कट्टे (अग्निशस्त्र/ पिस्टल) व दोन जिवंत काडतुस मिळून आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आपले नाव नागेश्वर उर्फ नागेश महेंद्र पावरा (वय २१, बुडकी- बुराडी ता. शिरपूर, जि.धुळे) सांगितले. झडतीमध्ये मिळून आलेले गावठी कट्टे त्याने विक्री करीता आणले असल्याचे पोलिसांकडे कबुल केले. या आरोपीविरुध्द धुळेसह इतरत्र गुन्हे दाखल असून तो अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती कर्जत पोलिसांनी दिली. सदरची कारवाई जिल्हा अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे, पोलीस हवालदार अमोल भैलुमे, सागर जंगम, प्रताप देवकाते, मच्छिंद्र जाधव, प्रकाश दंदाडे यांनी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here