
Case Registered : नगर : अहिल्यानगर शहरातील कल्याण रोड (Kalyan Road) परिसरात रविवारी (ता. १७) रात्री दोन गटात हाणामाऱ्या झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत रील स्टार सनी जाधव (Sunny Jadhav), राजेंद्र जाधव, समीर जहागीरदार, अक्षय जाधव, प्रमोद दाणे यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे. रवी ज्ञानेश्वर साळुंखे (वय 30 रा. गणेश चौक बोल्हेगाव फाटा अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे.
नक्की वाचा : गळफास घेत ३५ वर्षीय व्यक्तीने संपवले जीवन; राहुरी फॅक्टरी येथील घटना
जाधव याने फिर्यादीला भेटण्यासाठी बोलवले
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना अक्षय जाधव यांनी फोन करून बऱ्याच दिवसांपासून भेटलो नाही, आज भेटायला ये. तेव्हा मी व माझा मित्र निखिल चव्हाण असे आम्ही दोघे दुचाकी वरून त्यांच्या घरा शेजारी असलेल्या एका पेट्रोल पंपाशेजारी आलो होतो अक्षय जाधव मला भेटायला येऊन तो आम्हाला त्याच्या घरी घेऊन गेला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
शिवीगाळ करत लाकडी दांड्याने मारहाण (Case Registered)
तेव्हा अक्षय समीर जहांगीरदार, सनी जाधव, यांच्यासोबत घरगुती वाद चालू होते. त्यामुळे आम्ही दोघे त्यांच्या घराच्या समोर बाजूला थांबलो. तेव्हा मला सनी जाधव माझ्या जवळ आला व तो मला म्हणाला की तू इथे काय करत आहे. असे म्हणत फिर्यादीशी हुज्जत घालून शिवीगाळ करत लाकडी दांड्याने मारहाण केली. कोतवाली पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


