MLA Sangram Jagtap : आमदार संग्राम जगताप यांची सोशल मीडियावर बदनामी; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

MLA Sangram Jagtap : आमदार संग्राम जगताप यांची सोशल मीडियावर बदनामी; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0

MLA Sangram Jagtap : नगर : आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांचे नाव घेऊन सोशल मिडीयावर (Social Media) धार्मिक भावना भडकविणारे आणि दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल असे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी एका महिलेविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) सोमवारी (ता.१८) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : बेलवंडी पोलिसांनी पकडला ‘श्रीगोंदा’ हद्दीतील गुटखा; नूतन एसपींच्या आदेशाने कारवाई

आक्षेपार्ह व भडकाऊ भाषा

अफरोज हमीद शेख (रा. केडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित महिलेचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार अनुप झाडबुके (वय ३२) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. ते सध्या गोपनीय शाखेत काम पाहत आहेत. रविवारी (ता. १७) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ते पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना त्यांच्या मोबाईलवरील इंस्टाग्राम अ‍ॅपमध्ये व्हिडीओ पाहत होते. त्यावेळी एका इंस्टाग्राम आयडीवर एक व्हिडीओ आढळून आला. संबंधित व्हिडीओमध्ये एका महिलेने आमदार जगताप, धर्म तसेच धार्मिक परंपरांबाबत अत्यंत आक्षेपार्ह, अश्लील व भडकाऊ भाषा वापरत वक्तव्य केल्याचे निदर्शनास आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता (MLA Sangram Jagtap)

सदर वक्तव्यामुळे दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच प्राथमिक माहितीनुसार संबंधित महिलेचे नाव अफरोज हमीद शेख असून ती केडगाव येथील रहिवासी असल्याचे समजते. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात संबंधित महिलेविरूध्द धार्मिक भावना दुखावणे, समाजात वैमनस्य निर्माण करणे तसेच सोशल मिडीयाव्दारे आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.