Kopargaon : कोपरगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कोपरगाव यांच्या वतीने कलश मंगल कार्यालय येथे कोपरगाव मतदार संघातील ईयत्ता दहावी, बारावी तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य ‘गुणगौरव सोहळा’ रविवार (दि.१७) रोजी आमदार आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते सुप्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
हेही वाचा : मयत माजी सैनिकाच्या नावावरील रायफल चोरीला; पाथर्डी शहरातील घटना
आमदार काळे म्हणले…
“शिक्षण हे केवळ गुण मिळवण्याचे माध्यम नसून व्यक्तिमत्त्व घडविण्याची आणि उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करणारी प्रभावी शक्ती आहे. जीवनात मोठे ध्येय गाठायचे असेल तर सातत्यपूर्ण प्रयत्न, सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास अत्यंत महत्वाचा असून जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावरच यश तुमच्या पायाशी लोळण घेईल.” असा सल्ला आमदार आशुतोष काळे यांनी दहावी-बारावीच्या गुणवंतांना दिला.
नक्की पहा : भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण होण्याचे कारण काय?
कला जोपासावी (Kopargaon )
यावेळी सुप्रसिद्ध हास्य कवी यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि, हे स्पर्धेचे युग आहे शिक्षण आणि पदव्या मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे अनेक आवाहन आहेत. त्यमुळे मिळविलेल्या पदवीबरोबरच स्वतःच्या अंगी असलेली कला जोपासा त्या कलेचा तुमचे भविष्य उज्वल करण्यासाठी निश्चितपणे मदत होईल. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गुणवंत विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते.



