AMC : नगर : अहिल्यानगर शहराच्या सर्वांगीण आणि दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला विकास आराखडा (डीपी प्लॅन) अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे सादर करण्यात आला.
हेही वाचा : औषध विक्रेता बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना; अन्न व औषध प्रशासनाकडून ‘हे’ आवाहन
महासभेसमोर सादरीकरण
शहराच्या भविष्यातील वाढ, रस्ते, सार्वजनिक सुविधा, हरित क्षेत्र, नागरी सुविधा व नियोजनबद्ध विस्तार यांचा विचार करून हा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. विकास आराखडा हा गोपनीय स्वरूपाचा दस्तऐवज असल्याने तो नियमानुसार महासभेसमोर सादर करण्यात येणार असून त्यानंतर पुढील प्रशासकीय प्रक्रिया व कार्यवाही करण्यात येणार आहे.
नक्की पहा : प्रोफेसर चौकात रस्ता पॅचिंगचे काम सुरू
शहर विकाससाठी महत्वपूर्ण पाऊल (AMC)
शहराचा समतोल, सुयोग्य आणि शाश्वत विकास घडवण्यासाठी महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असून भविष्यातील अहिल्यानगर अधिक सक्षम, आधुनिक आणि नियोजनबद्ध करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.



