Anti-encroachment Drive : NEET पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मोटेगावकरच्या क्लासवर बुलडोझर; मालकाने मालमत्ता कर थकविल्याने कारवाई

0

Anti-encroachment Drive : नगर : NEET पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरला सीबीआयने ताब्यात घेतल्याने सोशल मीडियावर त्यांच्या कोचिंग क्लासेसवर कारवाईची मागणी जोर धरत होती. अखेर महापालिकेने अतिक्रमण आणि बेकायदा वापराच्या आधारावर ही कारवाई केली आहे. पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने मोटेगावकर यांच्या RCC क्लासच्या डेक्कन भागातील शाखेवर कारवाई केली.

हेही वाचा : अहिल्यानगर शहराचा डीपी आराखडा आयुक्तांना सादर

विना परवानगी क्लास

क्लास चालवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इमारतीचा काही भाग अतिक्रमण असल्याचे सांगत तो भाग पाडण्यात आला. तसेच विना परवानगी क्लास सुरू केल्याबद्दल नोटीसही बजावण्यात आली आहे.ही इमारत मोटेगावकर यांच्या मालकीची नसून ती भाड्याने घेतली होती.

नक्की पहा : प्रोफेसर चौकात रस्ता पॅचिंगचे काम सुरू

मनसेच्या तक्रारीनंतर कारवाई (Anti-encroachment Drive)

इमारतीचे मालक एम.पी. जोशी यांनी तीन कोटी वीस लाख रुपयांचा मालमत्ता कर थकवला असल्याने इमारतीवर सील ठोकण्याची कारवाईही करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या क्लासेसच्या बेकायदा वापराबाबत तक्रार दाखल केली होती. तसेच कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. मनसेच्या या तक्रारीनंतर आणि आंदोलनाच्या दबावानंतर महापालिकेने ही कारवाई केली.