
National Shooting Volleyball Championship : राहुरी : १७ वर्षांखालील (Under-17) गटातील ४५ व्या राष्ट्रीय शुटींग व्हॉलीबॉल स्पर्धेत (National Shooting Volleyball Championship) महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. ही स्पर्धा १२ ते १४ मे रोजी तेलंगणा (Telangana) राज्यातील मेहमुदाबाद येथे झाली.
नक्की वाचा : १७ वर्षीय अपहृत अल्पवीन मुलीची सुटका; कोतवाली पोलिसांची कामगिरी
राहुरी परिसरात आनंदाचे वातावरण
या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तिसरे मानांकन मिळवले. विशेष म्हणजे, राहुरी फॅक्टरी येथील तीन खेळाडूंनी महाराष्ट्र संघात स्थान मिळवत आपल्या खेळाची छाप पाडली. या संघात सानिका किरण कोबरणे, श्वेताली दत्तात्रय गोपाळे आणि जान्हवी सोमनाथ जाधव या खेळाडूंचा समावेश होता. त्यांच्या या यशामुळे राहुरी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
निबे यांचे मोलाचे मार्गदर्शन (National Shooting Volleyball Championship)
या खेळाडूंना अम्युचर शुटींग व्हॉलीबॉल राज्य फेडरेशनचे सचिव सुनील कंठाळे, राज्य फेडरेशनचे सदस्य नाना काळे, अहिल्यानगर जिल्हा शुटींग व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष मुस्ताक शेख, तसेच प्रशिक्षक राजेंद्र पुजारी व संदीप निबे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


