
Kashinath Date : पारनेर : अहिल्यानगर जिल्ह्यात मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) व वादळी वाऱ्यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नैसर्गिक संकटात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळावी यासाठी पारनेर-नगर विधानसभा (Parner-Nagar Assembly Constituency) मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते (Kashinath Date) यांनी सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा करत प्रभावी प्रयत्न केले.
नक्की वाचा : नदीजोड प्रकल्पांची कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी समन्वयाने काम करा : राधाकृष्ण विखे पाटील
शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील ३०० गावांमधील तब्बल २७ हजार ६०२ शेतकरी बाधित झाले असून १४ हजार ३४९.३७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी सुमारे २५ कोटी २० लाख रुपयांच्या जो मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता त्यास मंजुरी मिळाली आहे. पारनेर व अहिल्यानगर तालुक्यातील एकूण २८ गावांतील बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी प्रशासन व शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
प्रस्ताव गतीने पुढे नेण्यास महत्त्वाची भूमिका (Kashinath Date)
शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी वेळोवेळी चर्चा करून प्रस्ताव गतीने पुढे नेण्यास महत्त्वाची भूमिका बजावली.संकटकाळात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे नेतृत्व म्हणून आमदार काशिनाथ दाते सर यांची भूमिका यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची मदत लवकरात लवकर मिळावी, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरूच असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


