Shevgaon : शेवगाव : शहरातील क्रांती चौक परिसरातील अतिक्रमणावर शेवगाव नगर परिषदेने बुधवारी (ता. २०) संध्याकाळी धडक कारवाई केली. नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी स्वतः अतिक्रमण हटाव मोहिमेत सहभागी होत कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली.
हेही वाचा : पाथर्डीतील जुन्या पालिका इमारतीत चोरी; ४२ हजारांचा ऐवज लंपास
अतिक्रमणामुळे अडथळे
शहरातील वाहतूक सुरळीत राहावी तसेच सुरू असलेल्या विकासकामांना अडथळा निर्माण होऊ नये, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाकडून देण्यात आली. सध्या तिसगाव–पैठण महामार्गाच्या रस्ते विकासाचे काम संबंधित यंत्रणेकडून सुरू असून, शहरातील काही ठिकाणी अतिक्रमणामुळे कामात अडथळे निर्माण होत होते. या पार्श्वभूमीवर क्रांती चौक परिसरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
नक्की पहा : कॉकरोच जनता पार्टी’चा धुमाकूळ! सरन्यायाधीशांनी ‘झुरळ’ म्हटलं अन् मराठी तरुणाने थेट पक्षच काढला
शहरात खळबळ (Shevgaon)
या मोहिमेत नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारवाईदरम्यान परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नगरपरिषदेच्या या धडक कारवाईची शहरभर चर्चा सुरू होती.



