
Fetal Sex Determination Test : नगर : राहाता तालुक्यातील गर्भलिंग निदान चाचणी गुन्ह्यात पुणे येथून अटक केलेल्या तीन आरोपींकडे केलेल्या चौकशीत आणखी एक लिंगनिदान चाचणी करणारे मशीन मारुती विश्वनाथ ढोरे (वय ४८, रा. वडगाव मावळ) याला विकल्याचे समोर आले. आरोर्पीची शारीरिक स्थिती अटक करण्यालायक नसल्याने त्याला तपासासाठी हजर राहण्याची समज देण्यात आली आहे.
हेही वाचा : अहिल्यानगर शहरातील नागापूर-बोल्हेगाव येथील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण
पोर्टेबल मशीन जप्त
लोणी पोलिस व अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयाची टीम वडगाव मावळ येथे गेली असताना ढोरे याच्याकडे सोनोग्राफी करणारे पोर्टेबल मशीन मिळून आले. सदरचे मशीन पोलिस पथकाने ताब्यात घेऊन जप्त केले आहे. याच मशीनच्या साहाय्याने हा आरोपीदेखील लिंग निदान चाचणी करत होता, असे निष्पन्न झाले आहे.
नक्की पहा : दरोड्याच्या तयारीतील आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
डॉक्टर नसूनही चाचणी (Fetal Sex Determination Test)
हा आरोपी डॉक्टर नाही तरीदेखील हा या पद्धतीच्या चाचण्या करत होता. आणखी काही डॉक्टरांना या पुणे येथील आरोपींनी लिंग निदान चाचणी करणारे मशीन विकल्याची तपासात कबुली दिली आहे. त्या दृष्टीने तपास पोलिस पथक करत आहे, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.


