
Anti-Encroachment Drive : राहुरी : देवळाली प्रवरा नगर पालिका (Deolali Pravara Municipal Council) हद्दीतील शासकीय जागेवरील अतिक्रमणांवर नगर पालिकेने बुधवार (ता. २०) रोजी मोठी कारवाई करत जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणे हटवली. एप्रिल महिन्यात हटविण्यात आलेली अतिक्रमणे पुन्हा उभारण्यात आल्याने प्रशासनाने ही मोहीम राबविली. जिल्हाधिकाऱ्यांच्या (District Collector) आदेशानुसार तसेच नगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार अतिक्रमण हटाव मोहीम (Anti-Encroachment Drive) सुरू करण्यात आली होती. अतिक्रमणधारकांना यापूर्वी दोन नोटिसा देण्यात आल्या होत्या. काहींनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली, तर उर्वरित ठिकाणी प्रशासनाने थेट कारवाई केली.
नक्की वाचा : जादा परताव्याचे आमिष दाखवून हजारो तरुणांची फसवणूक; कायदेशीर कारवाई करण्याची मागणी
पालिका आवारात मोठा जनसमुदाय
बाजारतळ परिसरातील टपऱ्या व पत्र्याचे शेड हटविण्यात आले. या कारवाईमुळे मुख्य रस्ते मोकळे झाले असले तरी अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे.दरम्यान, धार्मिक स्थळावरील अतिक्रमण हटविण्यासाठी पालिका यंत्रणा सज्ज होताच मोठा जनसमुदाय पालिका आवारात जमला होता. शमूवेल साळवे यांनी संभाजीनगर उच्च न्यायालयातून स्थगिती मिळेपर्यंत कारवाई थांबविण्याची विनंती अधिकाऱ्यांकडे केली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
शासनाची कारवाई करण्याची भूमिका कायम (Anti-Encroachment Drive)
महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार काही दिवसांची मुदत देण्याचा विचार सुरू असतानाच मंत्रालयातून दूरध्वनीद्वारे अतिक्रमण हटविण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली. वाढत्या दबावामुळे प्रशासनाने कारवाई करण्याची भूमिका कायम ठेवली. अखेरीस शमूवेल साळवे यांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याची तयारी दर्शविल्यानंतर पालिका अधिकारी व पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला. यावेळी राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव येथील पोलीस बंदोबस्तासह राज्य उत्पादन शुल्क विभागाचीही मदत घेण्यात आली.
धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याचे आरोप
प्रशासनाकडून लवकरच शहरातील रस्ते व गल्लीबोळांतील अतिक्रमणांवरही कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.वंचित बहुजन आघाडी चे नगरसेवक संतोष चोळके यांनी या कारवाईचा निषेध केला.सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनातील प्रश्नाकडून लक्ष हटविण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. धनदांडग्या च्या अतिक्रमणांना कोणत्याही प्रकारचा हात लावण्यात आलेला नाही. धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याचे आरोप त्यांनी केले.दरम्यान या मोहीमेत वीस वर्षापासून पत्र्याचे धार्मिक स्थळ हटविली गेली.


