Appeal to Farmers : राज्यात पेट्रोल-डिझेलचा साठा भरपूर, शेतकऱ्यांनी विनाकारण घाई करू नये; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचं आवाहन

0

Appeal to Farmers : नगर : एकीकडे शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी डिझेल मिळेना झालंय, तर दुसरीकडे वाळू माफियांना तब्बल 25 हजार रुपयांचे डिझेल विक्री होत असल्याचाही प्रकार समोर आला आहे. त्यामुळे, सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. त्यातच, शेतकऱ्यांनी ज्यावेळी लागेल त्यावेळेसच पेट्रोल डिझेल घ्यावे, साठा करू नये, असे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलंय.

हेही वाचा : अण्णा हजारेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा; सरकारला म्हणाले…

परभणीत हाणामारी

राज्यात पेट्रोल डिझेलचा साठा मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याने पेट्रोल पंपांवर रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. परभणीत तर भलीमोठी रांग लागली असताना चक्क पेट्रोल-डिझेलचे ड्रम घेऊन हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं.

नक्की पहा : डिफेन्स मॅन्युफॅक्चरींगमध्ये महाराष्ट्राला कोणी थांबवू शकणार नाही…

साठवणूक करू नका (Appeal to Farmers)

दत्तात्रय भरणे पंढरीत विठ्ठल दर्शनासाठी आले असता, हवामान खात्याचा अंदाज चुकीचा ठरवून राज्यात धो धो पाऊस पडू दे असे साकडे त्यांनी पांडुरंगाला घातले. यावेळी, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना, राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा साठा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची घाई गडबड करू नये. ज्यावेळेस पेट्रोल डिझेल लागेल त्यावेळेसच घ्यावे. उगाच साठवणूक करू नये, असे आवाहन दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.