Thief Caught Red-Handed : विहिरीमधील मोटर व केबल चोरण्यासाठी आलेल्या चोराला रंगेहात पकडले; आंबी येथील घटना

दोघे जण त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल जागीच सोडून अंधाराचा फायदा घेवून पळाले

0
Thief Caught Red-Handed : विहिरीमधील मोटर व केबल चोरण्यासाठी आलेल्या चोराला रंगेहात पकडले; आंबी येथील घटना
Thief Caught Red-Handed : विहिरीमधील मोटर व केबल चोरण्यासाठी आलेल्या चोराला रंगेहात पकडले; आंबी येथील घटना

Thief Caught Red-Handed : राहुरी : विहिरीमधील मोटर (Motor)केबल (Cable) चोरण्यासाठी आलेल्या तीन चोरां पैकी एका चोराला ग्रामस्थांनी पकडून (Thief Caught Red-Handed) पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना आंबी येथे . २२ मे रात्रीच्या सुमारास घडली.

नक्की वाचा : ॲम्बुलन्ससाठी राखीव इंधनाची मागणी; तहसीलदार यांना निवेदन

दोघे जण अंधाराचा फायदा घेवून पळाले

शरद बापुसाहेब डुकरे  हे आंबी येथे राहत असून त्यांची आंबी शिवारात शेती आहे. रात्री १० वाजेच्या सुमारास शरद डुकरे हे घरी असताना त्यांना त्यांच्या विहिरी जवळ संशयित इसम दिसले. त्यावेळी शरद डुकरे यांनी राजेंद्र व सुभाष डुकरे, भाऊराव टाकसाळ यांना सोबत घेऊन त्यांच्या विहिरी जवळ गेले. तेथे त्यांना विहीरी जवळ तीन इसम दिसले. त्यांना आवाज दिला असता त्यातील दोघे जण त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल जागीच सोडून अंधाराचा फायदा घेवून पळाले. तर एका चोराला ग्रामस्थांनी रंगेहात पकडले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

तीन जणांवर गुन्हा दाखल (Thief Caught Red-Handed)

त्यावेळी त्याने त्याचे नाव जमीर जहागीर शेख, (रा. चंदनझीरा, जि. जालना) असे सांगीतले. तसेच पळून गेलेले अक्षय देठे, (रा. राहुरी फॅक्टरी) व एक अज्ञात इसम आहे, अशी माहिती त्याने दिली. तसेच विहीरीवरची पाणबुडी मोटार व केबल चोरण्यासाठी आलो असल्याची कबुली आरोपीने दिली. यावेळी ग्रामस्थांनी पकडलेल्या चोराला पोलिसांच्या ताब्यात दिले. शरद बापुसाहेब डुकरे यांच्या फिर्यादीवरून तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.