Pathardi : पाथर्डी : सामूहिक अत्याचार झाल्याची फिर्याद पोलिस घेत नसल्याच्या कारणावरून काल (ता.२५) पाथर्डी पोलीस ठाण्यासमोर एका महिलेने आपल्या मुलासह अंगावर ज्वलनशील द्रव्य ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी महिलेसोबत आलेल्या व्यक्तीचा जमिनीवर पडून मृत्यू झाला.
हेही वाचा : जिल्ह्यात १० अवैध दारू विक्रेत्यांसह जुगार अड्ड्यावर छापा; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
नेमकं काय घडलं?
तालुक्यातील एका गावातील महिला आपला मुलगा व विठ्ठल खर्चन यांच्यासोबत पोलिस स्टेशनला आली होती. आपणावर सामूहिक अत्याचार झाला असे तिचे म्हणणे होते. मात्र, पोलिसांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप आहे. त्यामुळे पीडितेने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच वेळी त्यांच्या समवेत आलेले विठ्ठल खर्चन हे अचानक पोलिस ठाण्याच्या दारातच कोसळले. बराच वेळ त्यांच्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही. त्यानंतर त्यांना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
नक्की पहा : महायुतीकडून अहिल्यानगरमधील विधानसभा मतदारसंघाचा कोण असणार उमेदवार?
पोलिसांवर आरोप (Pathardi)
या घटनेनंतर मयताच्या नातेवाइकांनी पाथर्डी पोलिस ठाण्याच्या आवारात गोंधळ घातला. पोलिसांवर गंभीर आरोप करीत उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. फिर्यादी महिलेने आमच्या व्यक्तीचा पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करीत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह एका लोकप्रतिनिधींना दोषी धरले.



