नगर : साईभक्तांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. शिर्डी (Shirdi News) रेल्वे स्थानकावर (Shirdi Railway Station) आता रेल्वे गाड्यांच्या पार्किंगची समस्या (The Problem of Parking Railway Trains) कायमची मिटणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून शिर्डीत ‘स्टेबलिंग लाईन’ (Stabling Line) उभारणीचं काम युद्धपातळीवर सुरू झालं आहे. मात्र ही स्टेबलिंग लाईन म्हणजे नेमकं काय आणि याचा प्रवाशांना नेमका काय फायदा मिळणार? हे पाहुयात…
नक्की वाचा: पुण्यात २६ मेपासून जमावबंदी लागू ; नेमका आदेश काय?
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि रेल्वेगाड्यांच्या नियोजनासाठी ‘स्टेबलिंग लाइन’ उभारण्याचे काम मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. चालू वर्षाच्या नोव्हेंबर अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रेल्वे प्रशासनाने ठेवले आहे.
‘स्टेबलिंग लाईन’ म्हणजे काय? (Shirdi News)

ही संकल्पना प्रामुख्याने रेल्वे आणि मेट्रो वाहतुकीमध्ये वापरली जाते. सोप्या भाषेत सांगायचे झालं तर, रेल्वे गाड्या उभ्या करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅकला ‘स्टेबलिंग लाईन’ म्हणतात. जेव्हा रेल्वे गाड्या धावत नसतात. (उदा. रात्रीच्या वेळी किंवा दोन फेऱ्यांच्या मधल्या काळात) तेव्हा त्यांना मुख्य ट्रॅकवरून बाजूला नेऊन सुरक्षितपणे उभे करावे लागते. या कामासाठी स्टेबलिंग लाईनचा वापर होतो.
अवश्य वाचा: मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? वाचा सविस्तर…
नव्या स्टेबलिंग लाईन मुळे प्रवाशांची सोय होणार (Shirdi News)
आता नाशिकपासून जवळच असलेले महत्त्वाचे रेल्वे स्टेशन म्हणून शिर्डी रेल्वेस्थानकाकडे पाहिले जाते. त्यामुळे कुंभमेळ्या दरम्यान देशभरातून येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या या ठिकाणी थांबविल्या जाणार आहेत. या नव्या स्टेबलिंग लाइनमुळे गाड्या उभ्या करणे आणि प्रवाशांची सुरक्षित चढ-उतार करणे हे रेल्वे प्रशासनाला अधिक सुलभ होणार आहे. त्यादृष्टीने ही नवीन स्टेबलिंग लाइन तयार करण्याचे काम सुरू आहे.
कुंभमेळ्याच्या काळात शिर्डी आणि परिसरातील रेल्वेस्थानकांवर भाविक आणि प्रवाशांची अभूतपूर्व गर्दी होण्याची शक्यता आहे. या गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी राज्य शासन आणि रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. यासंदर्भात आगामी २९ तारखेला राज्य शासनासोबत रेल्वे अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्य शासनाकडून रेल्वे प्रशासनाला क्राउड मॅनेजमेंटचा सविस्तर प्लॅन दिला जाईल.
शिर्डी स्थानकासोबतच आजूबाजूच्या अन्य रेल्वेस्थानकांवरही भाविकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि सुरक्षाव्यवस्था यांसारख्या आवश्यक सोयी सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. आगामी कुंभमेळा आणि जगभरात विख्यात असलेले शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांना मात्र या स्टेबलिंग लाईनचा उपयोग होणार आहे.



