Review Meeting : आरोग्य विभागाच्या कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा; लिंग गुणोत्तर संतुलनासाठी दक्षतेचे आवाहन

0
Review Meeting : आरोग्य विभागाच्या कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा; लिंग गुणोत्तर संतुलनासाठी दक्षतेचे आवाहन
Review Meeting : आरोग्य विभागाच्या कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा; लिंग गुणोत्तर संतुलनासाठी दक्षतेचे आवाहन

Review Meeting : नगर : जिल्ह्यातील मुला-मुलींचे लिंग गुणोत्तर संतुलित राखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक दक्षतेने काम करावे. अनधिकृत सोनोग्राफी केंद्रांवर अचानक धाडी टाकून दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच टीबी मुक्त भारत अभियान आणि पल्स पोलिओ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून आरोग्यविषयक शासकीय उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी जबाबदारीने कार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.

हेही वाचा : शिर्डी रेल्वे स्थानकाला ‘स्टेबलिंग लाइन’चा काय फायदा होणार? 

अचानक तपासणी मोहिमा

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आरोग्य विभागाच्या कामकाजाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते. ते म्हणाले की, जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये लिंग गुणोत्तराचे प्रमाण कमी आहे, त्या गावांमध्ये विशेष जनजागृती बैठका आयोजित कराव्यात. मुलगा-मुलगी समानतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात यावी. तसेच गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करून अनधिकृत सोनोग्राफी केंद्रांविरुद्ध माहिती संकलित करावी आणि अचानक तपासणी मोहिमा राबवून दोषींवर कठोर कारवाई करावी.

नक्की पहा : पाथर्डी पोलीस ठाण्यासमोर आई-मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न; गोंधळात एकाचा मृत्यू

यांची उपस्थिती (Review Meeting)

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आरोग्य विभागाच्या कामकाजाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, अशासकीय सदस्य डॉ. सुधा कांकरिया यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस सहभागी झाले होते.