
नगर: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday Viran Dance) सध्या तिच्या ‘चांद मेरा दिल’ या चित्रपटातील (Chand Mera Dil Movie) एका डान्स सीनमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे. या चित्रपटातील तिचा भरतनाट्यम फ्युजन परफॉर्मन्सचा (Bharatanatyam Fusion Performance) व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी टीका केली आहे. काही प्रसिद्ध भरतनाट्यम कलाकारांनी सुद्धा या सादरीकरणाला दुःखद आणि विनाशकारी असेही म्हटले. या संपूर्ण वादावर आता अनन्याचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते चंकी पांडे (Chunky Panday) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नक्की वाचा: शिर्डी रेल्वे स्थानकाला ‘स्टेबलिंग लाइन’चा काय फायदा होणार?
चंकी पांडे नेमकं काय म्हणाले? (Ananya Panday Viran Dance)
चंकी पांडे यांनी आपली मुलगी अनन्याचे समर्थन करताना लोक या परफॉर्मन्सचा चुकीचा अर्थ लावत असल्याचे म्हटले. एका मुलाखतीत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, हा परफॉर्मन्स कधीही शुद्ध भरतनाट्यम म्हणून दाखवण्यात आलेला नव्हता. हा एक फ्युजन डान्स होता, जसा कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी सादर करतात.
चित्रपटातील डान्स हा भरतनाट्यम आणि आधुनिक डान्स स्टाइल्सचा संगम (Ananya Panday Viran Dance)
ते म्हणाले की, पारंपरिक भरतनाट्यम शिकण्यासाठी जवळपास २० वर्षांची मेहनत, शिस्त आणि सातत्य आवश्यक असते. हा नृत्यप्रकार अत्यंत तांत्रिक आणि सूक्ष्म बारकाव्यांनी भरलेला आहे. मात्र चित्रपटात दाखवण्यात आलेला डान्स हा पारंपरिक भरतनाट्यम आणि आधुनिक डान्स स्टाइल्सचा संगम होता. लोकांनी पूर्ण चित्रपट पाहून संदर्भ समजून घेतल्यानंतरच मत बनवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
अवश्य वाचा: आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची वारंवार बदली होण्याचे कारण नेमकं काय?
‘चांद मेरा दिल’ या चित्रपटात अनन्या पांडे ‘चांदनी’ ही भूमिका साकारत आहे. चित्रपटातील कथेनुसार तिची आई भरतनाट्यम नृत्यांगना असते. कथा इंजिनिअरिंग कॉलेजच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. एका दृश्यात चांदनी पारंपरिक भरतनाट्यम ऐवजी हिप-हॉप आणि लॉकिंग स्टाइल्ससोबत फ्युजन डान्स सादर करते. हाच सीन सोशल मीडियावर वादाचे कारण ठरला आहे.


