Shivdurg Trekkers : ऐतिहासिक काशी बारव संरक्षित होणार; ‘शिवदुर्ग’च्या पाठपुराव्याला यश

0
Shivdurg Trekkers : ऐतिहासिक काशी बारव संरक्षित होणार; ‘शिवदुर्ग’च्या पाठपुराव्याला यश
Shivdurg Trekkers : ऐतिहासिक काशी बारव संरक्षित होणार; ‘शिवदुर्ग’च्या पाठपुराव्याला यश

Shivdurg Trekkers : नगर : मांडवगण-श्रीगोंदा रस्ता रुंदीकरणाच्या कामामध्ये धोक्यात आलेली ऐतिहासिक काशीबारव अखेर सुरक्षित राहणार असल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे. बारव परिसरात पुन्हा खोदकाम सुरू झाले असले तरी, पुरातन वारशाला कोणतीही हानी न पोहोचवता रस्त्याचे काम करण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ही माहिती प्रत्यक्ष स्थळ पाहणी दरम्यान शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे यांना देण्यात आली.

हेही वाचा : हरियाणातील ‘रोड मराठा’ बांधव महाराष्ट्र दौऱ्यावर; श्रीगोंद्यातील पानिपतवीरांच्या स्मारकांना देणार भेटी 

शिवदुर्गचा पाठपुरावा

काशीबारव आणि परिसरातील जुनी चिंचेची झाडे वाचवण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनतर्फे पाठपुरावा सुरु होता. स्थानिक शेतकऱ्यांनीही चिंचेच्या झाडांच्या संरक्षणासाठी मोठा संघर्ष उभारला होता. अखेर या प्रयत्नांना यश मिळाले असून बारवेसह झाडेही सुरक्षित राहणार आहेत. या ऐतिहासिक वारशाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन व शिवदुर्ग वारसा संवर्धन समिती यांनी गेल्या वर्षभरात विविध शासकीय कार्यालयांशी सातत्याने पत्रव्यवहार केला.

नक्की पहा : कोपरगावात अवैध गोवंश कत्तलखान्यांवर हातोडा

कठडा बांधून बारव संरक्षित करणार (Shivdurg Trekkers)

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या माध्यमातूनही हा विषय प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला. दरम्यान, संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून शिलालेख आणि बारवेची रचना तपासली. त्यानंतर बारवेला कोणतीही हानी होणार नाही, याची खात्री करण्यात आली आहे. तसेच भविष्यात अपघात टाळण्यासाठी बारवेच्या कडेला संरक्षक कठडा उभारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. वारशाशी संबंधित असलेली ही ऐतिहासिक काशीबारव सुरक्षित ठेवल्याबद्दल शिवदुर्गच्यावतीने संबंधितांचे आभार व्यक्त करण्यात आले.